पिलखोड ता चाळीसगाव पिलखोड येथे समस्त ग्रामस्थ शिवप्रेमी तरुण मंडळ व कार्यकारी मार्फत छत्रपती शिवाजी महाराज जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली प्रारंभी आमदार मंगेश चव्हाण यांच्या हस्ते होळी मैदान चौकात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून पूजन केले. याप्रसंगी सरपंच नामदेव बाविस्कर व शिवप्रेमी तसेच मोठ्या संख्येने उपस्थित होते नंतर गावातून ट्रॅक्टर वरून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची मिरवणूक मोठ्या प्रमाणात उत्साहात पार पडली.
ग्रामपंचायत कार्यालयातील शिवजयंती
पिलखोड येथील ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच नामदेव बाविस्कर माजी सरपंच दिगंबर पाटील मुस्लिम समाजाचे कार्यकर्ते खलील पठाण यांनी शिवाजी महाराज यांचे प्रतिमेचे पूजन केले पत्रकार निंबा सोनार यांनी श्रीफळ वाहिले याप्रसंगी ग्राम सदस्य गुलाब मोरे साहेबराव मोरे बापूराव बाविस्कर पोलीस पाटील प्रशांत पाटील ग्रामविकास अधिकारी डी. डी. वाघ ग्रामपंचायत सदस्य मंडळ व ग्रामस्थ कर्मचारी वृंद उपस्थित होते.