पिलखोड ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादीचा झेंडा; ‘परिवर्तन’ पॅनलचे वर्चस्व प्रस्थापित

0

चाळीसगाव (प्रतिनिधी) तालुक्यात गेल्या १५ दिवसापासून सर्वत्र ग्रामपंचायत निवडणूकीचे वारे जोर धरत होतेत यात १० ग्रामपंचायत बिनविरोध करण्यात आल्यात तर उर्वरीत ६६ ग्रामपंचायतीसाठी दिनांक १५ जानेवारी रोजी मतदान पार पडले यात अनेक नवख्या उमेदवारांना संधी देत ग्रामस्थानी अनोखा कौल दिला आहे

 

यात पिलखोड ग्रामपंचायत निवडणूकीत ग्रामविकास पॅनल व राष्ट्रवादी पुरस्कृत परिवर्तन पॅनल यांच्यात १३ जागांसाठी समोरासमोर लढत झाली यात एकूण २६ उमेदवार रिंगणात उभे होतेत, यात परिवर्तन पॅनलने सरशी केली असून १३ जागांवर विजय मिळवत ग्रामपंचायतीत बहुमताने वर्चस्व प्रस्थापित केले आहे

 

गोकुळ बाविस्कर, भास्कर माळी, उमराव पाटील, बापू बाविस्कर, नामदेव माळी, सुपडू महाजन, सुभाष पाटील यांनी ग्रामविकास पॅनलला आव्हान उभे करीत परिवर्तन पॅनलच्या माध्यमातून विकासाचा अजेंडा घेत पॅनल उभे केले होते. यात १३ पैकी १३ जागांवर उमेदवारांनी विजय संपादित करीत परिवर्तन पॅनलचा झेंडा रोवला आहे

Leave A Reply

Your email address will not be published.