पारोळा, लोकशाही न्यूज नेटवर्क
जळगाव जिल्हा मध्यवर्ती बॅंकेच्या निवडणुक जाहीर झाली असुन यात सोमवारी दि,१८ रोजी नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची शेवट ची तारीख होती, यात पारोळा येथील आमदार चिमणराव पाटील तसेच त्यांचे सुपुत्र अमोल दादा पाटील हे बिनविरोध निवडुन आल्याने ही बातमी पारोळा येथे कळताच शिवसैनिकाच्या वतीने शहरात एकच जल्लोष करण्यात आला.
पारोळा तालुका विविध कार्यकारी सोसायटी या मतदार संघातुन आमदार चिमणराव रुपचंद पाटील तसेच एरंडोल तालुक्यातुन पारोळा कृषी उत्पन्न बाजार समिती चे सभापती अमोल चिमणराव पाटील यांचे एकमेव अर्ज प्राप्त झाल्याने दोघांची बिनविरोध निवड निश्चित झाली आहे. हे समजताच पारोळा तालुक्यातील शिवसैनिकांनी जल्लोष करित आमदार चिमणराव पाटील व अमोल दादा पाटील यांची भेट घेत अभिनंदन केले तसेच विविध श्रेत्रातील अनेक मान्यवरानी दोघा पिता-पुत्रावर अभिनंदनाचा वर्षाव केला.
यावेळी माजी नगराध्यक्ष चंद्रकांत पाटील, पारोळा तालुका शिवसेना प्रमुख बी. आर. पाटील, शहर प्रमुख अशोक मराठे, माजी नगरसेवक राजु कासार, कृषि उत्पन्न बाजार समिती संचालक मधुकर पाटील, कृषि उत्पन्न बाजार समिती संचालक मंडळ, पारोळा शेतकी संघ संचालक मंडळ, चंद्रकात दादा मित्र मंडळाचे सदस्य जयेश पाठक, राम उपरे सर, रमेश मोरे, पारोळा व्यापारी महासंघ पारोळा, तसेच विविध संस्था – संघटनेकडुन अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.