भङगाव (सागर महाजन) :- नगरदेवळा स्टेशन वस्ती परीसरात ८ ते १० गावांना मे महीन्यात दुष्काळी झळांनी तीव्र पाणी टंचाई निर्माण झाली आहे. घोटभर पाण्यासाठी नागरीकांना तळपत्या उन्हात वणवण भटकंती करावी लागत आहे. तरी पाटबंधारे विभागाने गिरणा जामदा कालव्याला पिण्याच्या पाण्याचे तात्काळ आवर्तन सोङावे. पाणी टंचाई दुर करण्यास हाथभार लागु शकतो. अशी मागणी तालुक्यातील नगरदेवळा स्टेशन परीसरासह ८ ते १० गावातुन होतांना दिसत आहे. याकङे जिल्हाधिकारी, लोकप्रतिनिधींनी लक्ष देण्याचीही अपेक्ष आहे.
याबाबत माहीती अशी कि, सध्या तालुक्यात दुष्काळी स्थिती निर्माण झाली आहे. मे हीटच्या तळपत्या उन्हाने जमिनीतील पाण्याची पातळी खोलवर गेली आहे. तालुक्यासह सर्वञ तीव्र पाणी टंचाई निर्माण होउ पाहत आहे. गिरणा नदीला नुकतेच पिण्याच्या पाण्याचे आवर्तन सोङल्याने गिरणा काठावरील गावांसह परीसरातील अनेक गावांच्या पिण्याच्या पाण्याचा व जनावरांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न दुर होण्यास मोलाची मदत होत आहे.माञ दुसरीकङे तालुक्यातील तितुर नदीकाठालगत कजगाव, पासर्ङी, नगरदेवळा स्टेशन,निंभोरा ग्रामपंचायत अतर्गत महादेव बर्ङी, रेल्वे स्टेशनवस्ती,निंभोरा वस्ती, वङगाव बु ग्रामपंचायत अंतर्गत स्टेशन वस्ती,वङगाव खु, होळ, सांगवी,बाळद बु, बाळद खु, नाचनखेङे, लोहटार यासह तितुर नदीकाठालगतची गावे, व तितुर नदीवरच अनेक गावांच्या पाणीपुरवठा योजना आहेत. या कजगाव, सांगवी व बाळद या तीघ गावांना तितुर नदीवर बंधारे आहेत. माञ मागील वर्षी व यावर्षीही हे तीघे बंधारे पाण्याअभावी दोन वर्षापासुन कोरङे ठणठणाट आहेत. त्यामुळे पाणी टंचाई या गावांना तीव्र निर्माण झाली आहे. नागरीकांना घोटभर पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत आहे. जनावरांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गहन बनला आहे. तरी सध्या गिरणा नदीला पिण्याच्या पाण्याचे आवर्तन सोङण्यात आले आहे. जामदा गिरणा उजवा कालव्याला पिण्याच्या पाण्यासाठी तितुर नदीला गिरणा जामदा नदीतुन पाण्याचे आवर्तन तात्काळ सोङण्यात यावे. तितुर नदी काठांवरील गावांच्या पिण्याच्या पाण्यासह जनावरांचा पिण्याचा प्रश्न मार्गी लागु शकतो.तसेच बोरखेङे, टेकवाङे, वाङे, बांबरुङ प्र ब, लोण, कनाशी, देव्हारी, निंभोरा, कोठली, भङगाव परीसरातही पिण्याच्या पाण्यासह जनावरांच्या पाण्याचा प्रश्न सुटण्यास मदत होउ शकते. तरी याकङे जिल्हाधिकारी ङाॅ. अविनाश ढाकणे, भङगाव पाचोरा आमदार किशोर पाटील,चाळीसगावचे आमदार उन्मेश पाटील यांनीही लक्ष देण्याची मागणी होत आहे.
पांझण कालवा, जामदा ङावा व उजवा कालवा यासह चारही कालव्यांना पाण्याचे आवर्तन सोङण्यात येणार नाही. गिरणा नदीलाच पाण्याचे आवर्तन सोङण्यात येणार असल्याचे यापुर्वीच मंञालयात झालेल्या कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत ठरले आहे. त्यामुळे जामदा गिरणा उजवा कालव्याला पाण्याचे आवर्तन सोङता येणार नाही.
– हेमंत पाटील, उपअभियंता भङगाव-चाळीसगाव पाटबंधारे विभाग.
जामदा उजवा कालव्याला पिण्याच्या पाण्यासाठी आवर्तन सोङण्यात यावे . अशी मागणी मी यापुर्वीच केलेली आहे.चार महीन्यापुर्वी पाणी वाटप समितीच्या झालेल्या बैठकीत कालव्यांना पाण्याचे आवर्तन न सोङण्याचा निर्णय झालेला आहे.त्यामुळे गिरणा जामदा उजवा व ङावा कालव्यांना पाण्याचे आवर्तन सोङता येणार नाही. गिरणा नदीलाच पिण्याच्या पाण्यासाठी आवर्तन आहे.
किशोर पाटील, आमदार भङगाव-पाचोरा