पिकावर फवारणी करताना १२ शेतमजूर महिलांना विषबाधा

0

favarani साठी इमेज परिणामजळगाव : शेतात मक्याच्या पिकावर फवारणी करीत असताना १२ महिलांना विषबाधा झाल्याची घटना पाथरी (ता.जळगाव) शिवारात शनिवारी संध्याकाळी घडली. दरम्यान, या महिलांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

जळगाव येथील सूर्यवंशी (पूर्ण नाव माहित नाही) यांचे पाथरी शिवारात शेत आहे. त्यांचे शेत उमेश (पूर्ण नाव माहित नाही) यांनी शेत करण्यासाठी घेतले आहे. या शेतामध्ये महिला कामासाठी गेल्या होत्या. तेथे मक्याच्या पिकावर फवारणी करीत असताना महिलांचे हात पिवळे पडले व त्यांना चक्कर येऊ लागले. संध्याकाळी शेतातून या महिला घरी आल्यानंतर चक्कर अधिकच वाढले व काही वेळातच त्यांना उलट्याही झाल्या. त्रास अधिकच वाढू लागल्याने या महिलांंना जिल्हा रुग्णालयात आणण्यात आले. येथे येईप़र्यंत त्यांची प्रकृती अधिकच ढासळली व रुग्णालयातदेखील त्यांना उलट्यांचा मोठ्या प्रमाणात त्रास झाला. महिलांची स्थिती पाहून नातेवाईक व परिसरातील नागरिक अधिकच भयभीत झाले. तातडीचे उपचार सुरू झाल्यानंतर उलट्यांचे प्रमाण कमी झाले, मात्र चक्कर येणे सुरूच होते. रात्रीपर्यंत हा त्रास सुरूच होता. येतील यातील दोन महिलांना ऑक्सिजन लावण्यात आले असून प्रकृतीत सुधारणा होत असल्याचे सांगण्यात आले.

या महिलांना झाला विषबाधा
वावदडा येथील ज्यातीबाई आनंदा गोपाळ (वय २७), शितल साईनाथ गोपाळ (१५), अनिता सुरेश गोपाळ (४०), मुक्ता सुरेश गोपाळ (१७), बेबाबाई मधुकर गोपाळ (५५), हिराबाई ज्ञानेश्वर गोपाळ (२७), अनिता गोपाळ (२२), निर्मला गोपाळ (२४), ज्योताबाई गोपाळ (४०), भुराबाई गोपाळ (३५), मंगलाबाई गोपाळ (३५) व सरलाबाई अलकारी (वय २२, सर्व रा.वावडदा) या महिलांना विषबाधा झाली.

Leave A Reply

Your email address will not be published.