पिंप्री खु” येथील स्वस्त धान्य दुकानाची चौकशी करण्याची मागणी

0

पाचोरा –  पिंप्री खु” प्र.पा. ता. पाचोरा येथे सावित्रीबाई फुले स्वस्त धान्य हे दुकान बचत गट चालवत असुन दुकानदार चालक मनमानी कारभार करत असुन ग्राहकांना उध्दठपणाची वागणुक देत आहे. ग्राहकांना वेळेवर धान्य पुरवठा न करणे, अपुर्ण माल देणे, दुकानात कोणत्याही प्रकारचे भाव फलक व स्टाॅक फलक न लावणे.

याबाबत विचारणा केली असता खोटे गुन्हे दाखल करणे असले प्रकार होत असल्याने या रेशन दुकानाची सखोल चौकशी करून कारवाई करावी अशी लेखी निवेदनाद्वारे येथील किशोर लक्ष्मण पाटील यांनी तहसिलदारांकडे केली आहे. याबाबत पुरवठा अधिकारी कुमारी पुनम थोरात यांचेशी संपर्क साधला असता त्यांनी याबाबत तक्रारी अर्ज दाखल झालेला असुन प्रकरणाची सखोल चौकशी करून कारवाईसाठी वरिष्ठांकडे पाठवणार असल्याची माहिती आमच्या प्रतिनीधीशी बोलतांना दिली.

Leave A Reply

Your email address will not be published.