पिंप्रीत होमिओपॅथिक औषधीचे वाटप

0

पिंप्री खुर्द, ता. धरणगाव (प्रतिनिधी) : येथील ग्रामपंचायतच्या वतीने कोरोनाच्या संकट काळात गावातील नागरीकांची रोग प्रतिकार शक्ती वाढवणारे आर्सेनिक अल्बम-३० या होमिओपॅथिक औषधांचा  पुरवठा गावातील प्रत्येक कुटुंबियांना करण्यात येत आहे.गावात जवळपास २५०० बॉटलचे वाटप करण्यात येत आहेत. यापूर्वी गावात चार वेळा हायड्रोक्लोराडची फवारणी ,परिवारातील प्रत्येक सदस्यास मास व सॅनिटायझर बॉटलचे वाटप करण्यात आले आहे.

या उपक्रमाची आज सुरूवात करण्यात आली. या प्रसंगी सरपंच पती विजय सुर्यवंशी , उपसरपंचपती देविदास चौधरी , माजी सरपंच अरूण पवार ,नाना भाऊ बडगुजर, शिवाभाऊ बडगुजर, राकेश चौधरी, मनोज पांडे, राजू बिजाविरे, बापू बडगुजर, अनुसया ताई सोनवणे, गीताबाई सोनवणे, ग्रामविकास अधिकारी सुनिल बोरसे, मंडळ अधिकारी सुरेश बोरसे, तलाठी सचिन कलोरे, स्वंच्छतागृही बाळू चौधरी, भरत शिंपी , निलेश बडगुजर कर्मचारी सुभाष सोनवणे, तुषार चौधरी, राजू राठोड उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.