पिंप्राळा परिसरात मजुराची गळफास घेऊन आत्महत्या

0

जळगाव;- पिंप्राळा परिसरातील मीराबाई नगर येथे राहणाऱ्या ३२ वर्षीय तरुण मजुराने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना १८ रोजी सायंकाळी उघडकीस आली असून यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. प्रदीप सदाशिव महाजन (वय-३२ ) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे
गेल्या काही वर्षांपासून प्रदीप महाजन याचे जळगावात वास्तव्य असून दिवाळीनिमित्त त्याची बायको हि माहेरी गेली आहे बुधवारी सायंकाळी शेजारच्यांच्या लक्षात आत्महत्येचा प्रकार आल्यानंतर त्यांनी पोलिसांना संपर्क केला. रामानंदनगर पोलीस ठाण्याचे पोलीसांनी घटनास्थळी धाव घेवून मृतेदहाचा पंचनामा केला. याप्रकरणी रामानंदनगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पो.कॉ. शिवाजी धुमाळ करीत आहे

Leave A Reply

Your email address will not be published.