अमळनेर : मार्च 2019 मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता दहावी परीक्षेचा निकाल आज जाहीर करण्यात आला आहे. तालुक्यातील पिंपळे बु।। येथील अनुदानित आश्रमशाळेचा शैक्षणिक वर्ष २०१८-१९ चा इयत्ता १० वी चा निकाल ९८.५०% लागला असुन परीक्षेस बसलेल्या एकुण ६७ विद्यार्थ्यांपैकी ६६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. मुलांमध्ये पावरा तारासिंग सुभाष ७८.८०% व पावरा सागर शिवाजी ७८.८०% यांनी संयुक्त रीत्या प्रथम क्रमांक मिळवला व मुलींमध्ये पावरा वृषाली बबन हिने ७७.८०% मिळवुन प्रथम क्रमांक मिळवला आहे.
या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे, त्यांच्या मार्गदर्शक शिक्षकांचे व मुख्याध्यापक उदय पाटील व अविनाश अहिरे यांचे अभिनंदन चिंतामणी महिला एज्यु. सोसा. अध्यक्षा विद्याताई पाटील, शैक्षणिक मार्गर्शक युवराज दगाजी पाटील, अॅड. अभिजीत पाटील तसेच सर्व संचालक मंडळाने अभिनंदन करुन भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.