पिंपळगाव हरेश्‍वर मंदिरात सप्ताहाला प्रारंभ

0

पाचोरा, दि. 30 –
पिंपळगाव हरेश्‍वर येथील हरिहरेश्‍वर मंदिरात आज दुपारी नामसंकीर्तन सप्ताहाची स्थापना माजी जि. प. सदस्य तथा चाळीसगाव मेडिकल कॉलेजचे चेअरमन डॉ. उत्तमराव महाजन यांच्या हस्ते करण्यात आली. यावेळी संस्थानचे अध्यक्ष शालिग्राम मालकर, खजिनदार राजू गायकवाड, गोविंदा येवळे, दिलीप देशमुख, शाम बहाळे, विनोद महाजन, हभप माधव महाराज, अशोक वाघे, गोविंदा गुरव, निंबदास माळी, ओंकार महाजन, भगवान महाजन यांच्यासह भाविक, सेवेकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हरिहरेश्‍वर मंदिर साधारणतः हजार बाराशे वर्षपूर्वीच असावे. हे मंदिर हेमाडपंथी असून बहुळा नदीच्या तीरावर वसलेलं आहे. इथे हरी आणि हरेश्‍वराची भेट झाली व भस्मासुराचा वध हरी म्हणजे विष्णूने केल्याची आख्यायिका आहे.
हरिहरेश्‍वर मंदिराच्या नावानेच गावच सुद्धा नाव पिंपळगाव हरेश्‍वर पडलं आहे. हे एक जागरूक देवस्थान असून अनेक भाविकांचे श्रद्धास्थान आहे.
यावेळी संस्थानच्या वतीने सर्वांचा यथोचित सत्कार करण्यात आला.
गेल्या अनेक वर्षांची सदर सप्ताहाला परंपरा असून पूर्ण गावजेवणाचा कार्यक्रम येत्या बुधवार दि 5 सप्टेंबर रोजी आयोजित करण्यात येणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.