पिंपळगाव हरेश्वर येथे शिवजयंती साजरी

0

पिंपळगाव हरेश्वर – राजश्री शाहू महाराज बहुउद्देशीय सेवाभावी संस्था सरस्वती शिशु वाटिका प्रति पंढरपुर पिंपळगाव हरेश्वर येथे पोवाडे देशभक्तीपर गीते गाऊन केली शिवजयंती साजरी. छत्रपती शिवाजी महाराजांची,मावळे,समाजसेवक क्रांतीकारकांच्या वेशभूषा सादर करून विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदवला. या कार्यक्रमांमध्ये विशेष उपस्थिती बुलढाणा अर्बन बँकेचे मॅनेजर वर्षा ठाकरे मॅडम यांच्या हातून छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.

कार्यक्रमात उपस्थित पालक वर्ग सतीश वाणी नितीन गोरे संस्थेचे कार्यकारी अधिकारी विकास लोहार, योगेश हटकर, गजानन हटकर,संतोष गोरे, शिवाजी लोहार,विशाल राजु हटकर, तसेच ज्यांनी परिश्रम घेतले असे शिंदे ताई ठाकूर, ताई क्षीरसागर ताई,  पुण्यनगरी चे वार्ताहार पिं हरेश्वर राजु शिवाजी ठाकुर,यांनी विशेष प्रयत्नातून कार्यक्रम यशस्वी केला.

Leave A Reply

Your email address will not be published.