पिंपळगाव (हरे), ता. पाचोरा | प्रतिनिधी
परिसरातील शिंदाड शिवारात कपाशी उपटण्याच्या कामासाठी गेलेल्या शेतकऱ्याचा दुपारी काम पूर्ण करून घरी आल्यास मृत्यू चकरा व तोंडाला फेस येऊन तडफडून उष्माघाताने मृत्यू झाल्याची घटना रविवारी एक वाजला दुपारी घडली.या प्रकरणी पिंपळगाव हरेश्वर महसूल विभागाकडून घटनेचा पंचनामा करण्यात आला असून घटनास्थळी गावातील लोकप्रतिनिधींनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.दरम्यान परिसरात उष्माघाताचा बळी असल्याची चर्चा परिसरात सुरू आहे एकनाथ काशिनाथ कुंभार(वय ४५)असे उष्माघाताने मृत झालेल्या शेतकऱ्याचं नाव आहे. पिंपळगाव हरेश्वर तालुका पाचोरा शिंदाड शिवारात कपाशी उपटण्याच्या कामासाठी शेतात गेला असता त्याचा घरी येताच मृत्यू झाला आहे. शेजारील लोकांच्या लक्षात ही घटना येताच त्यांनी तातडीने त्यास ग्रामीण रुग्णालय पिंपळगाव(हरे) ता.पाचोरा येथे तातडीने उपचारासाठी दाखल केले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यास मृत घोषित केले.दरम्यान पाचोरा तालुक्यात आठवडाभरापासून उन्हाची तीव्रता अधिकच प्रकर्षाने जाणवत असल्याने तालुक्याचे जनजीवन विस्कळीत झाले आहे.जळगाव जिल्ह्याच्या सीमारेषेवर असलेल्या पिंपळगाव हरेश्वर पाचोरा तालुक्यात उन्हाची दाहकता वाढली असल्याने खानदेशचं तापमानाने तालुकावासी होरपळले आहे
Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.