जामनेर( प्रतिनिधी):- तालुक्यातील पिपरखेडा येथील 23 वर्षीय युवकावर रानडुकराने आज दीं.13 रोजी संध्या.4 वाजेच्या सुमारास हल्ला केल्याने तो गंभीर जखमी झा ल्याची घटना घडली असून त्याच्यावर जामनेर येथील उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार करून त्याला साकेगाव येथील गोदावरी रुग्णालयात पुढील उपचारासाठी पाठविण्यात आले आहे. त्याचे सविस्तर असे की पिपरखेडा येथील तरुण प्रशांत विजय पाटील हा आपल्या गावाजवळील शेतात कपाशीच्या परखाट्या उपटण्यासाठी आपल्या मोटार सायकल वरून जात असताना समोरून धावत येणाऱ्या रानडुकराने त्याच्यावर हल्ला केला त्यावेळी प्रशांत याने मोटार सायकल सोडून पळ काढत जवळच असलेल्या विहिरीत उडी मारल्याने त्याचा जीव वाचला असून त्याला पुढील उपचारासाठी गोदावरी रुग्णालयात पाठविण्यात आले असून त्याच्यावर उपचार करण्यात येत आहे. अशीच घटना चार दिवसांपूर्वी तालुक्यातील कर्ण फाटा येथे सुद्धा घडली असून त्यात एक तरुणी जखमी झाली होती. सदरील घटना ही एकाच हप्त्यात घडलेली दुसरी घटना असून शेतीचे पेरणी पूर्व मशागतीची कामे सुरू असून शेतकरी सकाळ संध्याकाली आप आपल्या शेतात जाऊन राहिलेली शेतीचे कामे करीत आहे.त्यात जंगली प्राण्यांचा वावर वाढल्याने शेतकऱ्यांना जीव धोक्यात घालून कामे करावे लागत आहे.