Sunday, January 29, 2023

पावसाचा कहर.. पुरात अडकले नागरिक; हवाई दलाने वाचवले प्राण (व्हिडीओ)

- Advertisement -

विशाखापट्टनम, लोकशाही न्यूज नेटवर्क 

आंध्र प्रदेशच्या अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा कहर सुरुच आहे. शुक्रवारी समोर आलेल्या माहितीनुसार अनंतपूर जिल्ह्यातील चित्रावती नदीची पाणीपातळी प्रचंड वाढली. यात नदीमध्ये दहा लोक अडकले. हे लोक मदतीची मागणी करत होते. अशात भारतीय वायुसेनेच्या एमआय १७ विमानाच्या मदतीनं या सर्वांना बाहेर काढण्यात आलं. आंध्र प्रदेशच्या हवामान विभागाने मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.

- Advertisement -

इथे अनंतपूर जिल्ह्यातील चितत्रावाती नदीची पाणीपातळी अचानक वाढली. पाण्याची पातळी इतकी वाढली की हे पाणी पुलाच्या वरूनही वाहू लागलं. याचवेळी एका कारमधून चार लोक हा पुल पार करत होते. मात्र ते पुराच्या पाण्यात अडकले. पाहता पाहता ही कार वाहून गेली. यादरम्यान लोक मदतीसाठी मागणी करू लागले. त्यांना वाचवण्यासाठी सहा स्थानिक लोक जेसीबी घेऊन पोहोचले. मात्र पुराच्या पाण्यात जेसीबीही अडकला.

अशात हे दहा लोक मदतीसाठी ओरडू लागले. नदीच्या काठावर उभा असलेल्या काही लोकांनी या लोकांना दोरीच्या सहाय्याने बाहेर खेचण्याचा प्रयत्न केला. मात्र, ते अपयशी ठरले. अशा परिस्थितीत भारतीय हवाई दलाच्या एमआय-१७ हेलिकॉप्टरमधून चित्रावती नदीत अडकलेल्या १० जणांची सुखरूप सुटका करण्यात आली.

 

spot_imgspot_img

हे वाचायलाच हवे