पाळधी, ता. धरणगाव : येथे जागेच्या वादातून रमेश विठ्ठल सोनवणे यांनी शनि मंदिरामागे विषारी औषध घेऊन आत्महत्या केल्याची घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली.
शनि मंदिरातील पुजारी यांना रमेश सोनवणे यांचा मृत अवस्थेत मृतदेह मादिरामागे आढळून आले व त्यांच्या खिशात आरोपींचे नावाची एक चिठ्ठी आढळून आली. गेल्या दोन वर्षापासून आरोपी धमकी देत असे मयत रमेश विठ्ठल सोनवणे हे गेल्या 30 वर्षापासून पती-पत्नी हे दोघंच राहत असे त्यांच्या मुलगा बाहेरगावी असून रमेश सोनवणे हे हात मजुरी करत असे तसेच आरोपी गुलाब हिरालाल फुल झाडे हा मला ७ लाख रुपये मागते आणी नाही दिले तर जीवे ठार मारण्याची धमकी देतो असे चिठ्ठीत लिहून आहे.
या वारंवार धमकीच्या त्रासाला कंटाळून रमेश विठ्ठल सोनवणे यांनी आत्महत्या केली असा आरोप त्यांच्या पत्नी सुशिलाबाई रमेश सोनवणे यांनी केला.
रमेश विठ्ठल सोनवणे यांचे प्रेत पाळधी पोलीस चौकी येथे दोन तास प्रेत पडून होते. त्यांचे नातेवाईक यांची मागणी होती आरोपींवर जोपर्यंत अटक व गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत आम्ही हात लावणार नाही पाळधी पोलीस चौकी येथे मोठ्या प्रमाणात जमा जमला असता धरणगाव येथून पोलीस निरीक्षक दिसले यांनी येऊन गुन्हा दाखल व आरोपी करण्याचे आश्वासन दिले असता पुढील अनर्थ टळला पुढील तपास पोलिस निरीक्षक दिसले करीत आहे.