पाळधी-धरणगाव रस्त्यावरील एकलग्न जवळील कोरडे वृक्ष वाहनधारकांसाठी जीवावर बेतू शकते

0

जळगाव ( रजनीकांत पाटील):- जळगाव कडून पाळधी पुढील  हायवे  रस्त्यावरील एकलग्न या गावापुढे  पुढे रस्त्याच्या कडेला एक कोरडे वृक्ष उभे असून त्या वृक्षाच्या कोरड्या  फांद्या या लांबल्या असल्याने ते कधीही खाली पडू शकते व एखाद्याचा जीव देखील घेऊ शकते  त्या कोरड्या  वृक्षामुळे अपघात होण्याची दाट शक्यता असून सदर धोकादायक वृक्ष काढण्यात यावा, अशी मागणी वाहनधारकांनी केली आहे.

रस्त्यावरील जळगाव कडून धरणगाव कडे एरंडोल तसेच कडे  जाणाऱ्या वाहन धरकांची संख्या  जास्त वर्दळीची आहे तसेच त्या काही ठिकानी रस्त्याचे रुंदीकरण करून डांबरीकरण करण्याचे काम देखील चालू आहे.  बेशिस्त वाहनधारक भरधाव वेगाने वाहने हाकलत असल्याने वाहन पाठोपाठ वाहन धावणे सूरी असते ता बाबत नेहमी वापरनारे हे त्या वृक्षाकडे बघत भीतीने  बेफाम चालवत असतात या मुळे तेथे अपघात होण्याची दाट शक्यता आहे रस्त्यामधील धोकादायक वृक्ष लवकर काढावे अशी मागणी प्रवाशी व वाहन धरकांन कडून जोर धरत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.