पाळधी ता. धरणगाव :– पाळधी गावात जळगाव लोकसभा मतदार संघातील भाजप-शिवसेना महायुतीचे उमेदवार आ.उन्मेष पाटील यांच्या प्रचारार्थ आज निघालेल्या रॅलीमध्ये भाजप सेना महायुतीचे कार्यकर्त्यांनी प्रचंड घोषणाबाजी केली. ठिकठिकाणी माता भगिनीकडून औक्षण करण्यात आले. यावेळी उन्मेष पाटील यांनी गावकऱ्यांसोबत संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या.
याप्रसंगी सहकार मंत्री गुलाबराव पाटील, जिल्हा शिवसेना प्रमुख गुलाबराव वाघ,भाजप ज्येष्ठ नेते सुभाष आण्णा पाटील, जिल्हा उपाध्यक्ष पी सी आबा पाटील, नगरसेवक चंद्रशेखर अत्तरदे, जी.प.सदस्य प्रतापराव पाटील,जी.प.सदस्या माधुरी अत्तरदे, धरणगाव बाजार समितीचे सभापती पुनिलाल महाजन, माजी सभापती सचिन पवार, उपसभापती मुकुंद नन्नावरे यांच्यासह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.