जळगाव । पाळधी येथील कोमल संजय बारी या 17 वर्षीय अल्पवयीन मुलीने राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना मध्यरात्री 2.30 वाजेच्या सुमारास उघडकीस आली. याबाबत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून आत्महत्येचे कारण समजून आलेले नाही.
गावात यात्रा सुरु असल्याने संजय बारी व त्यांचा मुलगा याठिकाणी गेलेले होते. त्यामुळे कोमल व तिची आई हे दोघे अंगणात झोपले होते. मध्यरात्री कोमल हीने उठून घरात जावून गळफास घेतला. रात्री तिच्या आईला जाग आल्यानंतर तिने आजुबाजुला कोमलचा शोध घेतला. त्यानंतर तिने घराचा दरवाजा उघडून पाहिल्यानंतर कोमल हिने आत्महत्या केल्याचे दिसून आले.