रावेर – तालुक्यातील पाल येथील गुरांच्या दवाखान्यात पशुवैद्यकीय अधिकारी गैरहजर राहत असल्याने पाल सह परिसरातील खेड्यापाड्यातील गाय, बैल, शेळ्या इत्यादी पाळीव पशुधनास वेळेवर औषधोपचार मिळत नसल्याची खंत ग्रामस्थांमध्ये व्यक्त केली जात आहे.
गुरांच्या दवाखान्यात जबाबदार अधिकारी नसल्याने अन्य कर्मचारी वर्ग सुद्धा येथे दिसून येत नाही. गुरांचा दवाखाना फक्त देखावा म्हणून दिसून येतो असे म्हटल्यास वावगे ठरू नये. सदर प्रकार नेहमीचाच असल्याने पाळीव पशुधन धारकांमध्ये संतप्त भावना व्यक्त केली जात असून संबधित विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याबाबत दखल घेवून येथील गुरांच्या दवाखान्यात कायमस्वरूपी पशुवैद्यकीय अधिकाऱ्याची नेमणूक करण्याची मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे.