पालघर लोकसभेची जागा शिवसेनेला दिल्याने युतीचा मार्ग सुसाट

0

मुंबई : पालघर लोकसभा पोटनिवडणुकीच्या जागेवरून शिवसेना-भाजपमध्ये भांडणे सुरु होती. कोणत्याही परिस्थितीत ही जागा सोडणार नसल्याचे शिवेसना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले होते. जागेवरून शिवसेना व भाजप हे दोन्ही पक्ष परस्परांशी भिडले होते. पालघरमध्ये आगामी लोकसभा निवडणुकीत पालघरची लोकसभा जागा लढविण्याचा निर्धार पुन्हा शिवसेनेने केल्याने सोमवारी ‘मातोश्री’वरील बैठकीत पालघर लोकसभा मतदारसंघ शिवसेनेला देण्याबाबत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी हिरवा कंदील दाखवला आणि युतीचा मार्ग सुसाट सुटल्याचे खात्रीलायकरित्या समजते.

पालघर लोकसभा मतदारसंघातील दिवंगत खासदार चिंतामण वनगा यांचे चिरंजीव श्रीनिवास वनगा यांनी त्यांच्यावर भाजपने अन्याय केल्याची भूमिका घेत शिवसेनेते प्रवेश केला होता. श्रीनिवास वनगा यांना न्याय देण्यासाठी या जागेचा आग्रह उद्धव ठाकरे यांनी धरला होता. मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही जागा सोडण्यास नकार दिला होता. या जागेच्या बदल्यात श्रीनिवास वनगा यांना विधान परिषद देण्याबाबत तसेच विधान परिषदेच्या अन्य काही जागांवर मदत करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र शिवसेनेने याला नकार देत पालघर लोकसभेची पोटनिवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे राज्यात सत्तेवर असलेले हे दोन्ही पक्ष पालघर पोटनिवडणुकीत एकमेकांसमोर भिडले होते.

Leave A Reply

Your email address will not be published.