पालघर घटनेचा भडगाव तालुका मुस्लिम समाजकडून निषेध

0

भडगाव (प्रतिनिधी) : पालघर येथे काही दिवसांपूर्वी झालेल्या महंत, साधू या निष्पाप आदरनिया लोकांची माब लिंचिंग सारख्या प्रकारातून अमानवीय व अमानुषपने घडलेल्या हत्याकांड बद्दल भडगाव तालुका मुस्लिम समाजकडून निषेध व निंदा व्यक्त करण्यात आली. या घटनेतील दोषी लोकांवर फास्ट ट्रक कोर्टात केस चालवून फाशीची शिक्षा करण्यात यावी तसेच अश्या माब लिंचिंग सारख्या वारंवार घडणार्या घटनेला आळा घालण्याकरिता केंद्र शासन व राज्य शासनाने लवकरात लवकर कडक कायदा मंजूर करावा, असे निवेदन भडगाव तहसिलदार माधुरी आंधळे याना आज देण्यात आला आहे.

निवेदन देताना हाजी जाकीर कुरेशी-भारत मुक्ती मोर्चा जिल्हा अध्यक्ष,जळगाव, बब्बू सेठ-भाजप अल्पसंख्याक तालुका अध्यक्ष, सय्यद इम्रान अली-शिवसेना अल्पसंख्याक जळगाव जिल्हा अध्यक्ष, मोहसीन शेख मुनाफ-ग्रामीण मराठी मुस्लिम साहित्य चळवळ, जळगाव जिल्हा अध्यक्ष ,शेरखान भाई-अल्पसंख्याक तालुका अध्यक्ष,निसार शेख आमद  व इतर समाज बांधव उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.