पाळधी ता. धरणगाव (प्रतिनिधी) – कोरोनासारख्या महामारीत पोलीस प्रशासनावर कामाचा प्रचंड ताण असतांना पाळधी पोलीस प्रशासनाने रक्तदान सारखा सृजनशील उपक्रम राबविल्याने खाकीतील माणुसकीचे दर्शन झालं असल्याचं प्रतिपादन महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघांचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष प्रविण सपकाळे यांनी आज केले.
पाळधी पोलीस दुरक्षेत्र, ना. गुलाबराव पाटील फाउंडेशन, मुक्ती फाउंडेशन, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या संयुक्त विद्यमाने आज दिनांक ४ जुन रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.रक्तदान शिबिराच्या उदघाटन प्रसंगी व्यासपीठावर जि. प. सदस्य प्रताप पाटील, धरणगाव पोलीस निरीक्षक अंबादास मोरे, पंचायत समिती सभापती मुकुंद नन्नावरे, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघांचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष प्रविण सपकाळे,पाळधी दुरक्षेत्रचे सहाय्यक पो. निरीक्षक णेश बुवा बुवा, उद्योजक दिलीप बापू पाटील, सरपंच प्रकाश पाटील, मुकुंद गोसावी, जेष्ठ पत्रकारउ उपास्थितहोते.
यावेळी पोलीस निरीक्षक अंबादास मोरे, सहाय्यक पो. नि गणेश बुवा, पत्रकार भूषण महाजन यांनी रक्तदान केले. यावेळी ५४ रक्तदात्यांनी रक्तदान केले. शिबिराच्या यशस्वीतेसाठी पाळधी पोलीस दूरक्षेत्र सर्व ठाणे अंमलदार महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे सर्व पत्रकार गुलाबराव पाटील फाउंडेशन चे सर्व सदस्य मुक्ती फाऊंडेशनचे मुकुंद गोसावी व जिल्हा सामान्य रुग्णालयाचे उमेश कोल्हे निलेश पवार यांनी परिश्रम घेतले.