भुसावळ | प्रतिनिधी
येथील पांडुरंग टॉकीज मागील बालाजी मंदिर हॉलमध्ये पालकांसाठी दि. 23 ते 25 जून 2019 दरम्यान तीनदिवसीय मार्गदर्शनपर कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे.
मुलांसाठी उत्तम प्रेरणा स्रोत कसे बनावे, मुलांची वाईट वागणूक कशी दूर करावी, जबाबदारी व शिस्त यांची शिकवण कशी द्यावी, मुलांच्या दृष्टिकोनातून अनुकूलता कशी निर्माण करावी, सकारात्मक व्यवहार व मानसिकता यावर कसे लक्ष ठेवावे, एकाग्रता कशी वाढवावी यासह विविध विषयांवर मार्गदर्शन करण्यासाठी आर्ट ऑफ पॅरेंटिंग हा मार्गदर्शनपर कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. पालकांनी सहभागी होऊन लाभ घ्यावा, असे आवाहन डॉ. रेखा पाटील, डॉ. राजेंद्र फिरके, डॉ. हेमंत अग्रवाल, योगेश बैरागी यांनी केले आहे.