Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • आदिवासी लोक संघर्ष मोर्चाला किती ताण देणार?
    • दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांची दिवाळी तुटपुंज्या मदतीत!
    • एका धडकेत सहा जीव संपले; तीन चिमुकल्यांचाही दुर्दैवी अंत!
    • मसाल्यांतील भेसळीविरुद्ध राज्यभर कठोर कारवाईचे आदेश!
    • पाचोऱ्यात हातमजुराचा आर्थिक विवंचनेतुन गळफास
    • अदानी-अंबानींचे २० लाख कोटी रुपयांचे कर्जमाफी मग..
    • एसटी तोट्यात, तरी भाडेवाढीचा भार टाकणार नाही!
    • वाचनातून व्यक्तिमत्व सर्जनशील होते : चंद्रकांत चव्हाण
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»ताज्या बातम्या»पालकमंत्र्यांच्या हस्ते पीएसए ऑक्सिजन जनरेशन प्लांटचे उद्घाटन
    ताज्या बातम्या

    पालकमंत्र्यांच्या हस्ते पीएसए ऑक्सिजन जनरेशन प्लांटचे उद्घाटन

    Tushar BhambareBy Tushar BhambareOctober 7, 2021No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

    जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात गुरुवार दि. ७ ऑक्टोबर रोजी ऑक्सिजनचे पीएसए जनरेशन प्लांटचे पालकमंत्री तथा पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री ना.  गुलाबराव पाटील यांच्या हस्ते उद्घाटन झाले. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऋषिकेश येथे केलेले संबोधन ऑनलाईन झाले.

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऋषिकेश येथे हवेतून निर्माण होणाऱ्या पीएसए ऑक्सिजन जनरेशन प्लांटचे दीपप्रज्वलन करून उदघाटन केले. त्यानंतर पंतप्रधान यांनी देशभरातील पीएसए प्लांट बसविल्या गेलेल्या रुग्णालयांना ऑनलाईन संबोधन केले. जळगावात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात गुरुवारी सकाळी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते पीएसए ऑक्सिजन जनरेशन प्लांटचे उदघाटन श्रीफळ फोडून व ऑक्सिजन मशीनची कळ दाबून करण्यात आले. यावेळी आ.सुरेश भोळे, आ.संजय सावकारे यांच्यासह प्रभारी अधिष्ठाता डॉ.किशोर इंगोले, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.नागोजीराव चव्हाण, जिल्हा नियोजन समितीचे प्रतापराव पाटील, प्र. प्रशासकीय अधिकारी डॉ.जितेंद्र सुरवाडे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. भाऊराव नाखले उपस्थित होते.

    प्रसंगी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. यानंतर ना. गुलाबराव पाटील म्हणाले की, ऑक्सिजन जनरेशन प्लांट हा तिसऱ्या लाटेच्या तयारीसाठी खूप महत्त्वाचा प्रकल्प आहे. हा प्रकल्प रुग्णांच्या उपचारासाठी व बरे करण्यासाठी योगदान देईल यात शंका नाही, असेही पालकमंत्री पाटील म्हणाले.

    महाविद्यालयाच्या आवारात उभारलेल्या पीएसए ऑक्सिजन प्लांटचे मान्यवरांनी पाहणी करीत कौतुक केले. प्रसंगी कार्यक्रमासाठी ऑक्सिजन प्लांटचे समन्वयक डॉ.संदीप पटेल, उप वैद्यकीय अधीक्षक डॉ. इम्रान पठाण, डॉ. विलास मालकर यांच्यासह डॉ. इम्रान तेली, डॉ. बाळासाहेब सुरोशे, डॉ.वैभव सोनार, डॉ.योगिता बावस्कर, डॉ.उमेश जाधव, असिस्टंट मेट्रेन आशा चिखलकर यांच्यासह अधिकारी दिलीप मोराणकर, राजेंद्र धाकड, संजय चौधरी, संजय पाथरूट, महेश गुंडाळे आदी अधिकारी, डॉक्टर्स, कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

    काय आहे हा प्लांट ? 

    करोना संसर्ग आजाराच्या उद्रेक परिस्थितीत ऑक्सिजन रुग्णांच्या उपचारासाठी अत्यंत जीवरक्षक वायू ठरत आहे. जगभरात रुग्णांची संख्या वाढून त्यांना लागणाऱ्या ऑक्सिजनची गरज वाढली. त्यामुळे ऑक्सिजनची कमतरता जाणवू लागली. अशा परिस्थितीमध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये ऑक्सिजनची जागेवरच निर्मिती व्हावी यासाठी पी एस ए ऑक्सिजन जनरेशन प्लांट ही संकल्पना निर्माण झाली.

    सदर प्लांट द्वारे हवेतुनच ऑक्सिजनची जागेवर निर्मिती केली जाते. त्यामुळे लिक्विड ऑक्सिजन कंपन्यांवर अवलंबून राहावे लागत नाही. जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील प्लांट हा एक हजार लिटर प्रति मिनिट एवढा ऑक्सिजन निर्माण करू शकतो. दिवसाला साधारण १.८७ मेट्रिक टन एवढा ऑक्सिजन निर्माण होईल. जो रुग्णांच्या उपचारासाठी महत्त्वाचा ठरेल. हा प्लांट पीएम केअर अंतर्गत डीआरडीओ व राज्य शासनाच्या मदतीने उभारण्यात आला आहे.

    https://lokshahilive.com/wp-content/uploads/2026/09/WhatsApp-Video-2026-09-16-at-10.29.50-PM.mp4

    Gulabrao Patil jalgaon news
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Tushar Bhambare

    Related Posts

    जळगावात उभारणार ‌‘रेडक्रॉस सावली केअर सेंटर‌’!

    October 10, 2026

    योग्य नियोजनाने दुष्काळावरही मात करू!

    October 10, 2026

    मुक्ताईनगर ड्रोन प्रकरणाचा उलगडा; रेकी नव्हे, ते प्रशिक्षण विमान!

    October 10, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif