Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • दिवाळी पाडवा आणि भाऊबीज : नात्यातील जिव्हाळ्याचा दीपोत्सव
    • ठाकरेंची साथ सोडण्याच्या निर्णयाबाबत निंबाळकरांचे मोठे विधान
    • 15 डिसेंबरपर्यंत शेतातील बोअरवरील बंदी उठविणार
    • कोल्हापुरात गोकुळच्या माजी संचालकांना शिवीगाळ
    • अमेरिकेत ऐन दिवाळी समारंभात गोंधळ
    • दिवाळी : दंतकथांमागील शहाणपण
    • हे पैसे तुमचे आहेत.. मोदीच्या बापाचे पैसे नाहीत!
    • दिवाळी सण उजळला, शेतकऱ्यांमध्ये मात्र अंधार!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • स्किन केअर
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»ताज्या बातम्या»पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत जिल्हा पोलीस दलास दुचाकी व चारचाकी प्रदान
    ताज्या बातम्या

    पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत जिल्हा पोलीस दलास दुचाकी व चारचाकी प्रदान

    Tushar BhambareBy Tushar BhambareAugust 2, 2021No Comments3 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव,लोकशाही न्यूज नेटवर्क 

    पोलीस हा अतिशय महत्वाचा घटक असतांनाही त्यांच्या बळकटीकरणासाठी निधी मिळण्यात अडचणी येत असल्या तरी यावर मात करण्यासाठी आपण प्रयत्न करू. खरं तर पोलीस आपल्या सुरक्षेची काळजी घेत असतांना त्यांची देखील काळजी घेण्याची गरज असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी केले. पोलीस दलास १५ बोलेरे आणि ३९ होंडा शाईन दुचाकी प्रदान करण्याच्या कार्यक्रमात ते बोलत होते.

    पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या पाठपुराव्याने आज जिल्हा पोलीस दलास १५ बोलेरो तर ३९ होंडा शाईन वाहने प्रदान करण्यात आली. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. प्रवीण मुंढे, महापौर जयश्री महाजन, अपर पोलीस अधिक्षक चंद्रकांत गवळी, सहायक पोलीस अधिक्षक कुमार चिंथा आदी मान्यवर उपस्थित होते. पालकमंत्र्यांनी हिरवा झेंडा दाखविल्यानंतर ही वाहने पोलीस दलाकडे सुपुर्द करण्यात आली.

     

    याप्रसंगी ना. गुलाबराव पाटील म्हणाले की, कोरोनाची आपत्ती असतांनाही पोलीस प्रशासनाला वाहनांची असणारी गरज लक्षात घेऊन आपण जिल्हा नियोजन मंडळाच्या माध्यमातून निधीला मान्यता दिली. तसेच जिल्हाधिकार्‍यांनीही याला परवानगी दिली. तसेच आजपासून १०० ऐवजी ११२ या क्रमांकावर आता आपत्कालीन सुविधा मिळणार आहे. जळगाव जिल्ह्यात कोरोनाचा प्रतिकार करण्यासाठी पोलीसांनी अतिशय महत्वाची भूमिका बजावली आहे. आज पोलीस दलास वाहने मिळाली असली तरी त्यांच्या सर्वच अडचणी दूर होतील असे नाही. तथापि, नवीन वाहनांमुळे पोलीस प्रशासनाला यामुळे चांगली सेवा प्रदान करता येणार आहे.

    ना. गुलाबराव पाटील पुढे म्हणाले की, अगदी लहान-सहान गावांमध्येही पुलांच्या कामांसाठी मोठा निधी मिळत असतो. मात्र कायदा व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी असणार्‍या पोलीस दलाला निधी मिळतांना अडचणी येत आहेत. मात्र यावर मात करून पोलीस प्रशासनाला नियमीतपणे निधी मिळावा यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत. जे आपल्या सुरक्षेची जबाबदारी घेतात, त्यांची काळजी घेण्याची देखील आवश्यकता आहे. याआधी देखील वाहने देण्यात आली असून उर्वरित वाहने आज प्रदान करण्यात येणार आहे. आगामी काळातही डीपीडीसीच्या माध्यमातून पोलीस दलाच्या बळकटीकरणासाठी प्रयत्न करण्यात येतील अशी ग्वाही ना. गुलाबराव पाटील यांनी याप्रसंगी दिली.

    या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. प्रवीण मुंढे, महापौर जयश्री महाजन, अपर पोलीस अधिक्षक चंद्रकांत गवळी, सहायक पोलीस अधिक्षक कुमार चिंथा , जिल्हा नियोजनचे डी. एस. पाटील यांच्यासह मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

    https://lokshahilive.com/wp-content/uploads/2026/09/WhatsApp-Video-2026-09-16-at-10.29.50-PM.mp4

    Gulabrao Patill jalgaon news Jalgaon Police latest news
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Tushar Bhambare

    Related Posts

    शरद पवार यांना ब्रीच कँडी रुग्णालयातून डिस्चार्ज

    November 7, 2026

    पारंपरिक चवीला आधुनिक साज देणाऱ्या हटके रेसिपीज

    November 3, 2026

    जळगावमध्ये अवैध धंद्यांचे जाळे फोफावले; जुगार अड्ड्यावर गोळीबाराच्या चर्चेने खळबळ!

    November 3, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif