पालकमंत्री डॉ राजेंद्र शिंगणे यांनी केली कोविड रूग्णालयातील सुविधांची पाहणी

0

बुलडाणा : शहरातील कोविड समर्पित रूग्णालयाला राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री तथा जिल्हयाचे पालकमंत्री ना. डॉ राजेंद्र शिंगणे यांनी 13 एप्रिल रोजी भेट दिली. यावेळी त्यांनी रूग्णालयातील विविध आरोग्यविषयक सुविधांचा आढावा घेतला. काम करताना येत असलेल्या अडचणी जाणून घेतल्या. यावेळी त्यांच्यासमवेत जिल्हाधिकारी एस रामामूर्ती,  अप्पर जिल्हाधिकारी दिनेश गिते, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ नितीन तडस, कोविड रूग्णालयाचे डॉ पाटील आदी उपस्थित होते.

याप्रसंगी पालकमंत्री डॉ शिंगणे यांनी ऑक्सीजनचा साठा असलेल्या 20 के.एल टँक, डयुरा सिलेंडर्स, जंबो सिलेंडर्स, रूग्णापर्यंत होत असलेला पुरवठा व गळती याबाबत पाहणी केली.  ऑक्सीजन हा सध्या अत्यंत महत्वाचा असून त्याची गळती होता कामा नये. गळतीमधून कुठल्याही प्रकारे ऑक्सीजन वाया जावू देवू नये. रूग्णालय परिसरात रूग्णांचे नातेवाई उन्हात थांबलेले असतात, या ठिकाणी नातेवाईकांचे उन्हापासून संरक्षण होण्यासाठी पेंडाल उभारण्यात यावा, अशा सूचनाही पालकमंत्री यांनी यावेळी दिल्या.

त्याचप्रमाणे याठिकाणी आणखी 20 के. एल चा ऑक्सिजनचा टँक लावून बाजुच्या अपंग विद्यालयात कोविड हॉस्पीटलचा विस्तार करण्याच्या अनुषंगाने पालकमंत्री डॉ शिंगणे यांनी पाहणी केली.  याठिकाणी लवकारात लवकर बेडची व्यवस्था करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.

Leave A Reply

Your email address will not be published.