पार्टी आटोपून परतणाऱ्या चाैघा मित्रांच्या कारला अपघात ; एक ठार, तीन जखमी

0

जळगाव : शहरानजीकच्या काेल्हे हिल्सवरून पार्टी अाटाेपून परतणाऱ्या चाैघा मित्रांची भरधाव कार चालकाचे नियंत्रण सुटल्याने उलटी. त्यात कार चालकाचा जागीच मृत्यू झाला तर तिघे मित्र जखमी झाले असून सुदैवाने ते बचावले अाहेत. ही घटना रविवारी सांयकाळी ६ वाजेच्या सुमारास घडली आहे. भूपेंद्र उर्फ गाेलू संताेष पाटील (वय ३०, रा. जिजाऊनगर जळगाव, मूळ गाव राेटावद, ता. धरणगाव) मृत युवकाचे नाव अाहे. जखमी तिघांना जिल्हा वैद्यकिय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.

अपघातातील मृत भूपेंद्र  पाटील हा अायसीअाय बंॅकेत एक्झिकेटीव्ह म्हणून नाेकरीला हाेता. या अपघातात विजय छाेटूराम ठाकूर (वय ३०, रा. हरिविठ्ठलनगर) या युवकाच्या नाकाला मार लागला. समेश पराग गुळवे (वय २८, रा. भूषण काॅलनी) व अालाप राजेंद्र कुलकर्णी (वय ३०, रा. मुंदडानगर) हे किरकाेळ जखमी झाले अाहेत. भूपेंद्र याच्यासह विजय, अालाप व समेश हे चाैघे मित्र कारने (एम.एच.१९ बी.जे. ८९८) रविवार असल्याने काेल्हे हिल्सवर पार्टीासाठी गेलेले हाेते. तेथे त्यांनी सायंकाळपर्यंत पार्टी केली. त्यानंतर चाैघेही कारने परत येत असतांना समोरून येणाऱ्या दुसऱ्या वाहनाला वाचविण्याच्या प्रयत्नात भुपेंद्र पाटील याचा कारवरील ताबा सुटल्याने कार थेट रोडच्या खाली उतरल्याने तीन वेळा पटली झाली. या अपघातात भुपेंद्रचा जागीच मृत्यू झाला. उर्वरित तिघांना जिल्हा वैद्यकिय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले.

मयत भुपेंद्र पाटील हा आयसीआयसीआय बँकेत नोकरीला होते. मुळ राहणार रोटवद ता. धरणगाव येथील रहिवाशी असून त्यांचे वडील संतोष पाटील हे रूस्तमजी इंग्लीश मिडीयम शाळेत सेक्यूरीटी म्हणून नोकरीला तर मोठा भाऊ दिपक पाटील हा पुण्यात खासगी कंपनीत नोकरीला आहे. त्याच्या पश्चात आई उषाबाई, वडील संतोष पाटील, पत्नी सपना, मोठा भाऊ दिपक पाटील आणि धनश्री आणि भाग्यश्री या दोन जुळवा मुली असा परीवार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.