विचारांना उजाळा;महिला झाल्या रममाण
पारोळा- येथील श्री स्वामी समर्थ वाचनालयात महिलांचा जिव्हाळ्याचा आपुलकीचा उत्सव अर्थात हळदी कुंकू कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.त्यात महिलांच्या विचारांना उजाळा मिळाला परिणामी महिला हळदीकुंकू कार्यक्रमात रममाण झाल्याचे पहावयास मिळाले.
श्री स्वामी समर्थ वाचनालयात ग्रंथपाल सोनाली सोनार यांनी हळदी कुंकू कार्यक्रमाचे आयोजण केले होते.त्यात महिलांनी उत्सूर्फ सहभाग नोंदवत जुन्या विचारांना उजाळा दिला. अध्यक्षस्थानी अलका बिचवे होत्या.अलका बिचवे यांनी आलेल्या महिलांना हल्दी कुंकू देऊन प्रत्येकी एक वस्तू वाण म्हणून भेट दिली.आलेल्या महिलांचे स्वागत ग्रंथपाल सोनाली सोनार व मदतनीस वैशाली महातेकर यांनी केलें यावेळी सिमा पाटील,माधुरी पाटील सुनीता लोहार,अनिता पिले ,जयश्री पाटील दर्शना जैन,ज्योती हजारे,नैना दाणेज आदी महिला उपस्तित होत्या.
पारंपरिक सणांना आधुनिकतेची झालर चढली असली तरी, अजूनही स्रियांनी अनेक पारंपरिक सणांचे महत्त्व कायम ठेवले आहे. त्यापैकी एक म्हणजे मकरसंक्रांतीच्या पार्श्वभूमीवर हळदीकुंकू कार्यक्रम आणि वाणांची लूट. काळानुरूप वाणांच्या वस्तू बदलल्या असल्या तरी, अजूनही हळदीकुंकवाचे महत्त्व मात्र अबाधित असल्याची प्रतिक्रिया महिलांनी ‘तरुण भारत’कडे व्यक्त केल्या.
पूर्वी चूल आणि मूल एवढेच स्त्रियांचे कार्यक्षेत्र होते. चार भिंतीच्या आत कोंडल्या गेलेल्या स्त्रियांना हळदीकुंकवासाठी बाहेर पडता यायचे. आता परिस्थितीत बदलली असली तरी, हळदीकुंकवाच्या प्रथेला मात्र अजूनही तितकेच महत्त्व आहे.
–सोनाली सोनार
ग्रंथपाल,श्री स्वामी समर्थ वाचनालय,पारोळा