पारोळ्यात बॅंका समोर पैसे काढण्यासाठी गर्दी ; सोशल डिस्टन्सचा फज्जा

0

पारोळा (प्रतिनिधी) : शहरात गेल्या दोन दिवसाच्या सुट्यां नंतर आज मंगळवारी  बॅंका उघडताच पैसे काढण्या साठी बॅकासमोर मोठया रांगा लागल्या होत्या मात्र सोशल डिस्टन्स ची प्रत्येकाला आठवण पडल्याचे पाहायला मिळाले.

येथील सर्व प्रमुख बॅंका मागील दोन दिवसापासून सुट्यां  असल्याने बंद होत्या पंरतु आज मंगळवारी सकाळी बॅंका उघडताच नागरीकांनी स्टेट बॅक, देना बॅक, महाराष्ट्र बँक, व इतर प्रमुख बँका मध्ये पैसे काढण्यासाठी गर्दी केल्या चे बघावयास मिळाले, शहरातील महाराष्ट्र बँक जवळ गर्दी जास्त च होत असल्याने पोलिसांनी रांगा मध्ये उभे असलेल्यांना तोंडाला रुमाल बांधा , आपल्या मध्ये अंतर ठेवा, विना कारण गर्दी करू नका असे सांगत असतानाही नागरीक गर्दी करीत होते.

या सर्व नागरिकांना कोणत्याही प्रकारची सोशल डिस्टन्स ठेवण्याचे भान दिसुन न आले प्रत्येक नागरिक हा एकमेकांच्या अगदी सहज व जवळ च उभे राहून हितगुज करताना आढळल्याचे दिसून आले  तसेच  महाराष्ट्र राज्यातील कोरोना वायरस पाजिटिव्ह रूग्णांची संख्या दिवसा गणिक वाढतच चालली आहे, त्यातच सरकार ने संपूर्ण महाराष्ट्रात संचार बंदी जाहीर केली आहे, व १४४ चे कलमानुसार ५ पेक्षा जास्त नागरिकांना एका ठिकाणी येण्यास मज्जाव केला असून या सर्व गोष्टींचा विसर येथे उपस्थित नागरिकांना पडलेला या ठिकाणी बघावयास मिळला . दरम्यान यातच भर म्हणून प्रधानमंत्री योजनेतील जन-धन खात्यात खाते दारांच्या खात्यावर पैसे आल्याने हे पैसे काढण्यासाठीही खातेदारांनी विशेषता महिलांनी बॅंका समोर जास्त गर्दी केली होती .

Leave A Reply

Your email address will not be published.