– वीस हजार रुपये चा दंड वसुल
पारोळा – शासनाने प्लास्टिक बंदी केली असताना ही पारोळा शहरात सर्रास पणे प्लास्टिक कॅरी बॅगा विक्री व वापर सुरु असल्याने नगर पालिकेच्या प्लास्टिक बंदी पथकाकडून शहरातील एकूण 25 दुकानावर धडक कार्यवाही करुन त्यापैकी 4 दुकानाकडून प्रत्येकी 5 हजार प्रमाणे दंड आकारण्यात आला. हि धडक कारवाई दिनांक १४ रोजी करण्यात आली . सदर
पथकात -मुख्याधिकारी विजयकुमार मुडे,संदीप साळुंखे,पंकज महाजन,रवींद्र पाटील,हिंमत पाटील,सतिष सानप, राहुल साळवे,संदीप पाटील,कृनाल सौपुरे, सचिन चौधरी, एन.एम.भामरे, किरण कंडारे, जगन जावळे. यांनी हि
मोहीम -बाजारपेठ,काजगाव रस्ता,मध्छी मार्केट, हायवे लगत असलेले हॉटेल तसेच दुकाने याकडे मोहीम राबवली या मोहिमेत
मे. वर्धमान प्रोव्हिजन, शिव बिकानेर मिठाई, न्यू आशापुरी किराणा, मे. वामन श्रीधर वाणी यांच्यावर कारवाई करीत प्रत्येकी
रु. पाच हजार दंड ठोठवण्यात आला यात एकूण 20000/- दंड वसूल करण्यात आला आहे . दरम्यान या कारवाई व्यापारी वर्गात खळबळ उडाली आहे .
..पथकाची कारवाई सुरु राहणार …
शहरात आज ही कॅरी बॅगचा सर्रास पणे वापर सुरु आहे . त्या साठी दररोज प्लॉस्टीक बंदी पथक कारवाई करणार असल्याने शहरात व्यापाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे

