घरच्याचा आक्रोश
पारोळा (प्रतिनिधी) :
येथील हिंगलाज मंदिरा जवळील रहिवाशी विजय धर्मा बडगुजर चालवीत असलेल्या वाहनाला ट्रकने मागवून ठोस मारल्याने तरुण जागीच ठार झाल्याची घटना शनिवारी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास घडली.
विजय धर्मा बडगुजर (२३) हे आपल्या वाहनाने बसस्थानक कडे टिव्हीएस मोटारसायकल क्र.एम एच १९ बी एल ७६३७ हिच्यावर सायंकाळी ६ वाजता जात असताना कजगाव नाक्यावर धुळे कडून जळगाव कडे जाणाऱ्या टाटा कंपनीच्या ट्रक क्र. जी जे १२ बी डब्ल्यू ८०७३ हिच्यावरील चालकाने रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून हायगायीने वाहन चालवीत विजय बडगुजर यांच्या वाहनाला मागवून ठोस मारल्याने बडगुजर गंभीर जखमी झाले.
अश्या गंभीर अवस्थेत रुग्णसेवक ईश्वर ठाकूर यांनी तत्परतेने रुग्णवाहिकेने कुटीर रुग्णालयात पोहचविले मात्र वैद्यकीय अधिकारी डाँ.योगेश साळुंखे यांनी तपासणी करून मयत घोषित केले.दरम्यान भाजपचे रवींद्र पाटील यांनी संबंधितांच्या कुटूंबियांना घटनेची माहिती दिली.याबाबत पोलिसात सुनील धर्मा बडगुजर यांच्या फिर्यादीवरून अज्ञात ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस करीत आहे.