पारोळा :- शहरात मागील अनेक महिन्यां पासून चोरी चे सत्र सुरू आहे. परंतु पोलिसांना वेळोवेळी आवाहन देणारा हा भुरटय़ा चोर मात्र आज पर्यंत सापडलेला नाही. यामुळे व्यावसायिक सह नागरिकां मध्ये भिती चे वातावरण निर्माण झाले आहे. मागील आठवडय़ात पिर दरवाजा रस्त्यावरील कटलरी चे दुकान फोडून दहा हजार रुपये रोख रक्कमेसह काही वस्तू ही चोरीस गेल्याचे सांगण्यात येते तर याच भागातील तुळजाभवानी इलेक्ट्रॉनिक. व्यंकटेश मोबाईल ही लागुन असलेल्या दुकानात दि, 17 च्या मध्यरात्रीनंतर दुकानाचा पत्रा कापुन चोरी करण्यात आली यात इलेक्ट्रॉनिक दुकानातून पंखे वायर बंडल असा 15 हजार रुपयांचा माल चोरून नेला तर दुसर्या मोबाईल दुकानातून काम्बो 15 हजारांचे. डिस्प्ले 8. हजारांचे. 20. हजारांहून अधिक जुने मोबाईल व अॅसेसरी असे एकूण 61 हजारावर माल चोरांनी चोरून नेला आहे. मागील अनेक वर्षांपासून चोरीची ही एकच पध्दत चोर अवलंबून चोरी करीत आहे. तरीही हा पोलिसांना सापडत नाही हे विशेष या मुळे व्यावसायिक आंदोलनाच्या भुमिकेत पर्यंत आले आहेत या चोराचा लवकरात लवकर बंदोबस्त व्हायला हवा अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.