पारोळा (प्रतिनिधी) :- पारोळा येथे होम मिनिस्टर फेम सिरीयलचे प्रसिद्ध अभिनेता व शिवसेनेचे सचिव आदेश बांदेकर यांचा माउली संवाद हा कार्यक्रम शिवसेनेच्यावतीने येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात उद्या दि, २१ आॅगस्ट बुधवार रोजी दुपारी १ वाजता आयोजित करण्यात आला आहे.
यावेळी शेतकरी, कष्टकरी, महिला भगिनींशी मुक्त संवाद साधण्यात येणार असून, या प्रसंगी राज्य सहकार मंत्री गुलाबराव पाटील, ग्रामविकास मंत्री दादा भुसे, जळगाव जिल्हा संपर्कप्रमुख संजय सावंत, महिला जिल्हा आघाडी प्रमुख महानंदा पाटील, तसेच अनेक मान्यवर उपस्थित राहणार असून तरी या कायॅक्रामास जास्तीत जास्त प्रमाणात उपस्थित द्यावी असे आवाहन पारोळा एरंडोल मतदार संघाचे माजी आमदार व तापी पाटबंधारे विकास महामंडळ उपाध्यक्ष चिमणराव पाटील व शिवसेनेच्या वतीने करण्यात आले आहे,