पारोळ्यातील व्यापाऱ्यांचे उपोषण तुर्तास पुढे ढकलले ; प्रशासन मार्ग काढणार

0

पारोळा (प्रतिनिधी) : गेल्या तीन ते साडेतीन महिन्या पासुन शहरातील मुख्य बाजार पेठ बंद असल्या मुळे बाजार पेठेतील लहान – मोठे व्यापाऱ्याचे अतोनात हाल होत आहे. त्या मुळे बाजार पेठ सुरू करण्यात यावा. या मागणी साठी दिनांक २६ पासुन समस्त व्यापारी असोशिएन तर्फे साखळी उपोषणाचे हत्यार उपसले होते. मात्र, प्रशासनाने लवकरात लवकऱ मार्ग काढू असे सांगितल्या नंतर व्यापाऱ्यांनी साखळी उपोषण सोमवार पर्यंत पुढे ढकलले आहे. प्रशासनाची काय भूमिका आहे या नंतर व्यापारी पुन्हा उपोषणाचे हत्यार उपसणार आहे.

दरम्यान शहरात कोरोनाचे रुग्णा मध्ये वाढ होत आहे. मात्र, कोरोनाचे रुग्ण फक्त पारोळ्यातील बाजार पेठेतच आहेत का? इतर तालुक्यातही कोरोना रुग्ण असतांना नियम व अटी लावून बाजार पेठ सुरु आहे. मग पारोळ्यातील व्यापाऱ्यावरच अन्याय का? या साठी दिनांक २५ रोजी पारोळ्यातील व्यापाऱ्यांच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी अभिजित राऊत साहेब यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिल्या नंतर ताबडतोब त्यांनी पारोळा तहसिलदार व मुख्याधिकारी यांना पारोळ्यातील बाजार पेठे विषयी चर्चा केली.

त्यानंतर पारोळा येथिल तहसिलदार यांनी व्यापाऱ्यांची तातडीने तहसिल कार्यालयात बैठक बोलविण्यात येवून तहसिलदार अनिल गवांदे , पारोळा मुख्याधिकारी डाॅ, विजय मुंडे . यांच्या बरोबर व्यापाऱ्यांच्या बैठकीत अनेक विषयी चर्चा होऊन दि. २६ रोजीचे व्यापाऱ्याचे साखळी उपोषण थांबवावे व लवकरात लवकर मार्ग काढून बाजार पेठ कशी सुरु होईल या साठी प्रयत्न करू. मात्र प्रशांसनाने लवकरच मार्ग काढू असे सांगितल्या नंतर प्रशासनांच्या शब्द ला मान देऊन सोमवार पर्यंत व्यापाऱ्यानी साखळी उपोषण पुढे ढकलले तुर्तासा स्थगिती दिली असुन सोमवार पर्यंत निर्णय न दिल्यास उपोषणाचे हत्यार उपसणार असल्याचे व्यापाऱ्यांच्या बैठकीत निर्णय झाला असल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले .

Leave A Reply

Your email address will not be published.