पारोळा- येथील शेतकीसंघाच्या अध्यक्षपदी शिवसेनेचे अरुण पाटील यांची मंगळवारी बिनविरोध निवड करण्यात आली. अध्यक्ष पदासाठी अरुण पाटील व उपाध्यक्ष पदासाठी सखाराम चौधरी यांचा एकमेव अर्ज आल्याने निवडणूक निर्णय अधिकारी सिहाले यांनी बिनविरोध निवड झाल्याची घोषणा केली.
यावेळी मावळते अध्यक्ष डाँ.राजेंद्र पाटील व उपाध्यक्ष भिकन महाजन यांनी सुत्रे नवनिर्वाचित अध्यक्ष उपाध्यक्ष यांच्याकडे सुपूर्द केली आहे.
पारोळा शेतकी संघाचे अध्यक्ष डाँ.राजेंद्र पाटील व उपाध्यक्ष भिकन महाजन यांनी राजीनामा दिल्याने अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीची सभा आ.चिमणराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सकाळी ११ वाजता बोलावण्यात आली होती. यावेळी अध्यक्ष पदासाठी अरुण दामू पाटील व उपाध्यक्ष पदासाठी सखाराम श्रावण चौधरी यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली. निवडीनंतर आ.चिमणराव पाटील,सभापती अमोल पाटील यांच्यासह संचालकानी नवनिर्वाचित अध्यक्ष व उपाध्यक्ष यांचा सत्कार केला.
नामनिर्देशन अर्जावर सूचक म्हणून डाँ.राजेंद्र पाटील तर अनुमोदक म्हणुन भिकन महाजन यांचे नाव होते.यावेळी डाँ.राजेंद्र पाटील,प्रा.आर बी पाटील,चतुर पाटील यांनी समयोचित भाषणे केली.
सर्वसामान्य कार्यकर्त्याला न्याय…आ,चिमणराव पाटील
शिवसेनेवर जनतेचा मोठा विश्वास आहे. गेल्या चाळीस-पंचेचाळीस वर्ष शेतकी संघ, कृषी उत्त्पन्न बाजार समितीसह सहकारी संस्थांवर शिवसेनेचे वर्चस्व गेल्या चाळीस वर्षापासुन आजही कायम आहे.असे सांगत संघाच्या मागील निवडणुकीत सर्व पक्ष एकत्रित आल्यावर देखील बहुमताने सेनेने निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले आहे.
यावेळी भरडधान्य खरेदीचा फार मोठी जबाबदारी संघावर आहे.लोकांचा मोठा विश्वास संघावर आहे म्हणून वशिलेबाजी न करता लोकांची कामे केंद्रबिंदू मानून पारदर्शी कामे करून चाळीस वर्षाचा प्रेमाचा अवमान करू नका असे सांगत खऱ्या अर्थाने प्रसिद्धीपराडमुख सर्वसामान्य कार्यकर्त्यांना न्याय मिळाला असल्याचे मत आ.पाटील यांनी स्पष्ट केले.
यावेळी पंचायत समितीचे सभापती रेखा भिल,उपसभापती अशोक पाटील,तालुकाप्रमुख प्रा.आर बी पाटील,शहरप्रमुख अशोक मराठे,संचालक मधुकर पाटील,प्रेमानद पाटील,प.स.सदस्य प्रमोद जाधव,शेळवे सरपंच राजेंद्र पाटील,जिजाबराब पाटील, प्रा.बी एन पाटील,सुधाकर पाटील,दीपक पाटील,आधार पाटील उपस्थित होते.