Wednesday, May 18, 2022

पारोळा शहराला २४ तास पाणी देण्याचे माझे स्वप्न: नगराध्यक्ष करण पाटील

spot_imgspot_img
- Advertisement -
- Advertisement -

पारोळा, लोकशाही न्यूज नेटवर्क 

- Advertisement -

पारोळा शहरातील प्रत्येक नागरिकास व प्रत्येक घरास चोवीस तास पाणी देण्याचे आमचे स्वप्न आहे, म्हणून दररोज व चोवीस तास पाणी मिळण्यापासून नागरिकांना वंचित करु नका तसेच कामाला ब्रेक लावू नका असे आवाहन पारोळा येथील लोकनियुक्त नगराध्यक्ष करण पाटील यांनी विरोधकांना एका प्रसिद्ध पत्रका द्वारे केले आहे.

- Advertisement -

पारोळा शहरातील वाढती लोकसंख्या व वाढलेल्या कॉलनी परिसर त्यास लागणारा फिल्टरेशन प्लांट सध्या असलेला प्लांट व पाइप लाईन हे जीर्ण झालेले आहेत. त्याच्या वाढीसाठी व नूतनीकरणासाठी आमचा शासन दरबारी पाठपुरावा सुरू आहे. यात जलशुध्दीकरण केंद्रासह पाण्याची टाकी,संपूर्ण शहरात नवीन पाईप लाईन याची संपूर्ण तपशीलासह माहिती नगरपालिकेमार्फत मंत्रालयात सादर केलेली आहे. परंतु कोरोनाच्या काळामुळे शासनाकडून  निधी वाटप करण्यात आलेला नाही.

एवढा मोठा प्रोजेक्ट राबवितांना शासनाला सर्व प्रकारच्या बारीक सारीक मुद्द्यांचा अभ्यास करावा लागतो.  आपल्या शहरातील काही मंडळी एक कोटी निधी आणून असा आव आणतात कि पाणी टाकी बांधली गेली तर नागरिकांना  दररोज पाणी मिळेल. त्यांची मला किव येते. लोकांना मूर्ख बनवण्याचे दिवस गेले आता, निवडणुकीच्या तोंडावर सामान्य जनतेच्या मनात गैरसमज पसरविण्याचे काम शहरात सध्या सुरू आहे. उलट या एक कोटी मंजुरीमुळे आपल्याला जो आपल्या हक्काचा दररोज २४ तास पाणी देण्याचा प्रश्न होता त्याला आता एक वेगळीच दिशा मिळण्याची शक्यता आहे.

पाण्याच्या टाकीसाठी निधी तर आम्ही ही कधिही आणु शकलो असतो परंतु मला २४ तास पाणी देण्याचे माझे आश्वासन पूर्ण करायचे आहे,  शहरातील जीर्ण झालेली पाईपलाईन, जल शुद्धीकरण केंद्र हे घटक पहिले बनविणे महत्त्वाचे आहे. आणि त्यानंतर पाण्याच्या टाकी चा विषय येईल. माजी विरोधकांना हात जोडून विनंती राहील की पारोळा शहरवासीयांच्या या ज्वलंत प्रश्नाला आपण वेगळे राजकीय वळण देऊ नका, १ कोटी निधी आणून दररोज पाणी देण्याचे स्वप्न लोकांना दाखवू नका. निवडणुकीच्या तोंडावर जुमलेबाजी करून लोकांना मूर्ख बनविण्याचा प्रयत्न करू नका, पारोळा शहरातील नागरिक सुज्ञ असून माझा त्यांच्यावर दृढ विश्वास आहे ते जुमेलबाजीला भिक घालणार  नाही, असे ही त्यांनी पत्रकात म्हटले आहे.

- Advertisement -
spot_imgspot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

हे वाचायलाच हवे

संबंधित बातम्या