पारोळा शहरात जनता कर्फ्यू ; व्यापाऱ्यांचा कडकडीत बंद

0

पारोळा (प्रतिनिधी) : रविवार हा शहरातील आठवडे बाजार असतांना ही शहरातील व्यापाऱ्यांनी जनता कर्फ्यू पाळून कोरोना कोव्हीड १९च्या पार्श्वभूमीवर सर्व सामान्यच्या विचार करता व पारोळा नगराध्यक्ष यांच्या आव्हानाला प्रतिसाद देत आज रविवार आठवडे बाजार सह लहान _ मोठया व्यापाऱ्यांनी शंभर टक्के बंद पाळला.

संपूर्ण शहरातील रस्ते ओस पडलेले दिसुन आले . त्यामुळे शहरात स्मशान शांतता होती. तर संपूर्ण शहर बंद आहे की नाही या साठी स्वता व्यापारी व नगरसेवकांनी फेर फटका मारून या शंभर टक्के बंद ची खातर जमा केली, शहरात कोठलेही ही दुकान किंवा हातगाडी वर माल विकणारे सुद्धा दिसून न आल्याने हा बंद पुर्णपणे यशस्वी झाला. या शंभर टक्के बंद च्या लाभ घेत नगरपालिकेच्या वतीने संपूर्ण बाजारपेठेत सॅनिटाइंग करून निर्जंतुकीकरणाची फवारणी करण्यात आली. या वेळी नगरपालिकेच्या अग्निशामक बंब च्या साहाय्याने निर्जंतुकीकरण करण्यात आले, या वेळी अग्निशामक बंब वर पारोळा नगरपालिकेचे आरोग्य सभापती हे स्वता बसुन कर्मचार्यांच्या साह्याने पुर्ण शहरातील न. पा, चौकापासून ते शेतकी संघ व नगर पालिका चौक ते राम मंदिर चौक बालाजी मंदिर, रथ चौक,तसेच कजगाव नाक्यापर्यंत निर्जंतुकीकरण फवारणी करण्यात आली. या वेळी पारोळा नगरपालिकेचे नगराध्यक्ष करण पवार, आरोग्य सभापती दिपक अनुष्ठान, कैलास पाटील, पी,जी, पाटील, प्रकाश वाणी, तसेच व्यापारी विलास वाणी, केशव क्षत्रिय, संजय कासार, अशोक कुमार लालवानी, अरूण वाणी, डि, डि, वाणी, आदिनी परिश्रम घेतले.

Leave A Reply

Your email address will not be published.