पारोळा (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्य शासनाच्या वतीने पारोळा येथे शिव भोजन थाळी साठी परवानगी देण्यात आली आहे, १०० थाळी शिव भोजन साठी शासनाच्या वतीने आवाहन करण्यात आले होते, यामुळे शहरातील दोन जणांनी अर्ज दाखल केले आहे.
या दोन्ही जनाची जागेची पाहणी पारोळा येथील तहसीलदार तथा समिती अध्यक्ष अनिल गवांदे तसेच पारोळा नगरपालिकेचे मुख्य अधिकारी तथा समिती सचिव डॉ विजय कुमार मुंडे, पुरवठा अधिकारी अनिल पाटील, शहर तलाठी निशिकांत पाटील, गौरव लाजेंकर यांनी शहरातील साईनाथ भरीत सेंटर, व मिनाक्षी मधुकर पाटील रेस्टॉरंट या दोन्ही अर्जदाराच्या जागेची पाहणी केली या ठिकाणी शासनाच्या निर्देशानुसार सर्व सुविधा जसे पाण्याची सोय अन्न औषध परवाना तसेच कमीत कमी २५ लोक बसण्याची सोय व महिलांसाठी वेगळा कक्ष अश्या सर्व सुविधा ची माहिती जाणून घेतली.
