पारोळा प्रतिनिधी : पारोळा कृषि उत्पन्न बाजार समितीच्या वतीने आज भरड धान्य खरेदी चा शुभारंभ करण्यात आला.
याबाबत अधिक असे कि पारोळा कृषि उत्त्पन्न बाजार समिती चे सभापती तथा जिल्हा बँकेचे संचालक अमोल चिमणराव पाटील यांच्या शुभहस्ते आज पारोळा येथे भरड धान्य खरेदी केंद्र चा शुभारंभ करण्यात आला. यावेळी शेतकऱ्यांची माल मोजमापाबाबत कुठलीही तक्रार नको तसेच नोंदणी प्रमाणे शेतकऱ्यांचा माल मोजमाप व्हावा यासाठी योग्य ती खबरदारी व नियोजन करण्याचा सुचना अमोल पाटील यांनी संबंधितांना दिल्या.
याप्रसंगी पारोळा तालुका तहसिलदार अनिल गवांदे, कृषि उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती दगडुबापु पाटील, बाजार समितीचे संचालक चतुर भाऊसाहेब, मधुकरआबा पाटील, प्रा.बी.एन.पाटील सर, डाॕ.पि.के.पाटील, डाॕ.सुनिल पाटील, सचिव रमेश चौधरी, पारोळा शिवसेना तालुकाप्रमुख प्रा.आर.बी.पाटील सर, शहरप्रमुख अशोकभाऊ मराठे, शेतकी संघाचे चेअरमन अरूणआबा पाटील, व्हा.चेअरमन सखारामनाना चौधरी, संचालक भिकनआप्पा महाजन, राजेंद्र पाटील, नाना पाटील, सुधाकर पाटील, जिजाबरावबापु पाटील, पोपटआण्णा चव्हाण, दासभाऊ पाटील, चेतन पाटील, व्यवस्थापक भरत पाटील, शंतनु पाटील, बापु मराठे, पंकज मराठे, विकास बोरसे, सतिष महाजन, रमेश जैन, योगेश पाटील तसेच पारोळा कृषि उत्पन्न बाजार समिती व पारोळा शेतकी संघाचे कर्मचारी उपस्थित होते.