नगरपालिका आणि पोलिसांच्या संयुक्त पथकाने राबवली मोहीम
पारोळा – पारोळा शहरात पारोळा नगर पालिका व पोलिस प्रशासना मार्फत शहरात विनामास्क फिरणाऱ्या आणि प्लास्टिक पिशव्या विक्रेत्यांविरुद्ध संयुक्त कारवाई करण्यात आली.
याबाबत अधिक असे कि काल दि,२१ रोजी पारोळा तहसिल येथे पारोळा एरंडोल विधान सभा क्षेत्राचे आ. चिमणराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पारोळा येथिल तहसिल कार्यालयात बैठक होऊन विनामास्क फिरणाऱ्या नागरिकांवर कारवाईचे आदेश देण्यात आले होते . त्या अनुषंगाने आज दि,२२ रविवार रोजी पासुन याची अंमलबजावणी करण्यात आली . यात आज सकाळी नऊ जणांवर कारवाई करित १८०० रु दंड म्हणुन वसुल करण्यात आला. तर ही कारवाई करित असताना शहरात बाजाराचा दिवस असल्याने अनेक नागरिकांच्या हातात कॅरिबॅगा दिसुन येत होत्या . हि बाब पारोळा नगर पालिकेच्या पथकास दिसुन आल्याने त्यांनी भाजिपाला विक्रेते व शहरातील कॅरिबॅग विक्रेते यांच्याकडे तपासणी केली असता ६० किलो कॅरिबॅग या विक्रेत्यांकडे मिळुन आल्या आहेत. या सर्व कॅरिबॅग पारोळा नगर पालिकेच्या पथकाने जप्त केल्या व भाजीपाला विक्रेता व शहरातील प्लास्टीक विक्रेत्यांना या पुढे जर कॅरिबॅग आढळुन आल्या तर दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याची सुचना केली. या संयुक्त कारवाई पथकात पारोळा नगर पालिकेच्या कार्यलय अधीक्षक संगमित्रा सदांनशिव,कर निरिक्षक संदिप सांळुखे,आरोग्य निरिक्षक डि,डि,नरवाळे,चंद्रकांत महाजन, पोलिस हे,काॅ,महेंद्र मराठे,एच,एम,पाटील,किशोर चौधरी,किरण कंडारे,सचिन चौधरी,या सह पारोळा नगर पालिकेच्या कर्मचाऱ्यांचा समावेश होता.