पारोळा (प्रतिनिधी) : शहरात विनाकारण फिरणार्यां वर पोलिस प्रशासन व नगर पालिकेच्या वतीने कडक कारवाई करण्यास सुरूवात करण्यात आली आहे.
याबाबत अधिक असे कि पारोळा शहरात विनाकारण फिरणार्यांवर पोलिस प्रशान व नगर पालिका पथका कडुन जागेवरच अॅन्टीजन टेस्ट करून कारवाई करण्यात येत आहे,यात जो कोणी कोरोना पाॅझिट्व्ह आढळुन आला त्यास तिथुनच शासकिय कोविड सेंटर ला रवानगी करण्यात येत असल्याची माहिती पारोळा मुख्याधिकारी ज्योती भगत यांनी दिली.
यामुळे विनाकारण फिरणार्यावर चाप बसेल,याच पारश्वभुमिवर पोलिस प्रशासना कडुन ही कठोर भुमिका घेत कडक कारवाई चे आदेश सायंकाळी उपविभागिय पोलिस अधिकारी राकेश जाधव यांनी दिले,त्यानी सांयकाळी पायी फिरून पारोळा शहराची व बाजार पेठेची पाहणी करत स्थितीचा आढावा घेतला यावेळेस ही काही विनाकारण फिरणार्यांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला या वेळी त्यांचा सोबत पारोळा पोलिस निरिक्षक संतोष भंडारे, पोलिस उपनिरिक्षक रविंद्र बागुल,तसेच पारोळा पोलिस स्टेशनचे कर्मचारी सोबत होते,याप्रसंगी नियम मोडणार्यावर कडक कारवाई करण्याच्या सुचना या वेळेस पोलिस प्रशालनाला देण्यात आल्याचे समजले.