पारोळा | प्रतिनीधी
तालुक्यातील शेवगे येथिल ग्रामसेवकास २५ हजाराची लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले, सन २०१८ मध्ये गावातील ३८ लाभार्थी यांना शासनाच्या स्वच्छ भारत मिशन योजने अंतर्गत मंजूर झालेल्या बांधकामाचे लाभार्थी यांना प्रत्येकी १२०००रूपये मिळाले आहेत, तसेच सन २०१९ मध्ये गावातील विहीरी चे गाळ काढण्याचे काम घेतले असता सदर काम ५२००० रूपयात तक्रारदारास मिळाले होते, ग्रामसेवक शाम पाटील यांनी पारोळा पंचायत समिती येथे तक्रारदारास बोलवून मागील शौचालय चे काम व आता चे गाव विहिरीच्या गाळाचे कामाचे बिले काढून दिले, म्हणून त्यांचा मोबदल्यात ३०००० रूपयांची मागणी केली, तक्रारदाराने सदर माहिती लाचलुचपत विभाग नाशिक याच्या कडे तक्रार दिली, त्यानुसार पंच व साक्षीदार याचे समक्ष लोकसेवक शाम पाटील यांना रू २५००० हजार लाचेची रोख रक्कम स्विकारल्यानंतर रंगेहाथ पकडण्यात आले, पोलीस उपनिरीक्षक सुनील कुराडे, महेश भोरटेकर, जंयत साळवे, संतोष हिरे, संदीप सोनवणे, तसेच इतर,यांनी ही कारवाई केली, ग्रामसेवक शाम पाटील यांना पारोळा पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले, पुढील कारवाई चालु आहे,