पारोळा (प्रतिनिधी) : पारोळा येथील ग्राम दैवत मानले जाणारे प्रभु बालाजी महाराजांची यात्रा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला, सालाबादप्रमाणे या वषॅी ही हा उत्सव एकादशी च्या दिवशी साजरा करण्यात आला, सकाळी सवॅ प्रथम संस्थान अध्यक्ष श्रीकांत रघुनाथ शिंपी यांच्या हस्ते विधीवत पुजा करण्यात आली, यांच्या सह मा, खा, ए, टी पाटील, मा, आ, चिमणराव पाटील, पारोळा एरंडोल-पारोळा चे विधमान आमदार सतिश भास्कराव पाटील, गोविंद शिरोळे, यांच्या सह पारोळा उपनगराध्यक्ष मंगेश तांबे, बालाजी संस्थान चे कायॅाध्यक्ष रावसाहेब भोसले, विश्वस्त अनिल गुजराथी, केशव क्षत्रिय, चंद्रकांत शिंपी, दिनेश सेठ गुजराथी, पारोळा नगरीचे लोकनियुक्त नगराध्यक्ष करण पवार, बाजार समिती सभापती अमोल पाटील, तसेच इतर मान्यवरांच्या हस्ते पारंपरिक पद्धतीने पुजा करण्यात आली, व दुपारी १,३०,मिनटानी रथ यात्रेस मोठ्या उत्साहात सुरूवात झाली, हजारोच्या संख्येने भाविक उपस्थित होते, या वेळी शहरातील सर्व लेझीम मंडळ जय गुरू व्यायाम शाळा, बालोदय व्यायाम शाळा, जय शिवाजी व्यायाम शाळा, जिजाऊ लेझीम मंडळ, जय भवानी लेझीम मंडळ, तसेच शहरातील अनेक लहान मोठे लेझीम मंडळे या उत्साहात सामिल झाले होते, सर्व लेझीम मंडळाचे सदस्य पारंपरिक वेशभूषेत होते, या वेळी जय जिजाऊ लेझीम महिला पथकाने पारंपारीक लेझीम चे खेळ खेळुन सर्वांचे लक्ष वेधून घेत संपूर्ण मिरवणुकीत आकषॅण ठरत होते, या वेळी महाराष्ट्र राज्यातील सर्वात उंच रथ म्हणून ख्याती असलेले पारोळा येथील रथास झेंडूच्या फुलांनी सजविण्यात आले होते, सायंकाळी आकषॅक विधूत रोषणाई ने सवॅ भाविकां भक्तांच्या नजरा रथावर स्थिरल्या होत्या, या प्रसंगी संपूर्ण शहर भक्तीमय झालेले होते, जिकडे तिकडे ”” लक्ष्मी रमणा गोविंद बालाजी महाराज कि जय”” च्या उद्घोषाने वातावरण भक्तीमय झाले होते, रात्री उशिरा २ वाजेच्या सुमारास रथ आपल्या नियोजित स्थळी पहुंचले या सर्व मिरवणूक मागॅावर रथाला मोगरी लावुन रथ व्यवस्थित मागॅस्थ करण्यात येथील मोगरी लावणारे बंधु ज्यात प्रमुख्याने बुधा बारी, प्रकाश चौधरी, मोतीलाल बारी, वंसत बारी, तसेच बालाजी स्वयंसेवक, तसेच इतर अनेक भाविक भक्तांना भक्तांनी श्री च्या रथास हाथ बार लावून रथोत्सव उत्साहात व शांततेत पार पाडल्या कामी मदत केली अश्या सवॅाचे बालाजी संस्थान तफॅे आभार व्यक्त करण्यात आले,