पारोळा -प्रतिनिधी पारोळा येथील बालाजी महाराज यांच्या यात्रा उत्सव दरम्यान अनेक लोकांचे मोबाईल व किमती दागिने चोरीस गेल्या च्या घटना घडल्या होत्या. या चोरी च्या घटने संदर्भात शुक्रवारी पोलीसांनी एका जणास अटक केली असता त्याचा कडे एक चोरीचा मोबाईल मिळून आला, पारोळा पोलीसांनी अटक केलेल्या अहमद अफजल अहमद (२४) असे या इसमाचे नाव आहे, त्यच्या कडे ईश्वर रतन पाटील यांच्या मुलीचा विवो कंपनी चा मोबाईल मिळून आला, या प्रकरणी त्यास कोटाॅत हजर केले असता, न्यायाधीश महाळनकर यांनी तीन दिवसाची पोलीस कस्टडी सुनावली, पुढील तपास पोलीस काॅन्स्टेबल बापु पाटील हे करीत आहेत,