पारोळा:- पारोळा येथे रविवारी साप्ताहिक आठवडे बाजारात मालेगाव येथील तिन मोबाइल चोरट्यांना रंगेहाथ पकडण्यात पारोळा पोलीसांना यश आले.
आठवडे बाजारात बाजारासाठी आलेले देवगाव येथील समाधान भिमराव सरदार याच्या मोबाइल दुपारच्या सुमारास बाजार करीत असताना चोरीस गेल्या चे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी लागलीच पारोळा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्या आधारावर पारोळा पोलीस निरीक्षक लिलाधर कानडे यांनी लगेच आपल्या सहकार्यना सांगीतले व लागलीच पोलीस काॅ, पकंज राठोड, राहुल कोळी, यांनी बाजारात फेरफटका मारून माहिती गोळा करून त्यांना मच्छीबाजारात संशयित आरोपी आढळून आला. त्यास ताब्यात घेतले व इतर आरोपींचा पाठलाग करून बसस्थानक परीसरातुन दोन जणांना रंगेहाथ पकडण्यात आले. त्यात मुक्तार शेख (६२), शेख सादिक शेख(३२) व मोहम्मद हारून मन्नास (३५) सवॅ राहाणार मालेगाव याना पकडण्यात आले. त्यांची झाडाझडती घेतली असता त्याच्या कडून सहा मोबाइल अंदाजे किम्मत २५ हजार हस्तगत करण्यात आले.
याबाबत समाधान भिमराव सरदार रा, देवगाव यांच्या फियाॅदी वरून पारोळा पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पारोळा पोलीस ठाण्याचे पंकज राठोड, राहुल कोळी, किशोर भोई, यांनी लागलीच गुन्हा उघडकीस आणून चांगली कामगिरी बजावली म्हणून त्यांचे शहरात कौतुक होत आहे.