पारोळा येथे मुख्याधिकारीपदी श्रीमती ज्योती भगत

0

पारोळा | प्रतिनिधी

येथिल मागील पाच महिन्या पासुन प्रभारी मुख्यअधिकारी असलेल्या पारोळा नगर पालिके ला आज शेवटी कायम स्वरूपी मुख्यधिकारी म्हणुन खुलताबाद येथे कार्यरत असलेल्या  श्रीमती ज्योती भगत यांनी पारोळा नगर पालिकेच्या मुख्यधिकारी म्हणुन पदभार स्वीकारला.
दिनांक २४ रोजी दुपारी नगरपालिकेच्या मुख्यधिकारी पदाचा पदभार श्रीमती ज्योती भगत यांनी स्वीकारल्या नंतर पारोळा नगराध्यक्ष करण पवार यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देवून स्वागत केले या वेळी  कैलास पाटील , नगरपालिका कर्मचारी उपस्थीत होते .  श्रीमती भगत ह्या या पुर्वी औरंगाबाद जिल्हयातील खुलताबाद नगरपालिकेच्या मुख्याधिकारी होत्या . दिनांक २३ डिसें रोजी त्यांची बदली होऊन त्यांनी २४ रोजी पारोळा मुख्याधिकारी पदाचा पदभार स्विकारला . मुख्याधिकारी विजयकुमार मुंडे यांची मनमाड येथे बदली झाल्या नंतर . अमळनेर आणि भडगांवचे  मुख्याधिकारी यांनी प्रभारी म्हणुन पदाभार स्विकारलेला होता . आता कायमस्वरूपी मुख्याधिकारी लाभल्याने शहरातील रखाडलेली विकासाची कामे मार्गी लागणार आहे .

Leave A Reply

Your email address will not be published.