पारोळा (प्रतिनिधी) : दैनिक लोकशाही दिनदर्शिकेचे बाॅम्बे बुट हाॅऊस पारोळा येथे मान्यवराच्यां हस्ते थाटात प्रकाशन करण्यात आले.
याबाबत अधिक असे कि दैनिक लोकशाही ची दिनदर्शिका प्रकाशित झाली असुन त्याचे जागोजागी प्रकाशन होत आहे,तसेच पारोळा येथे ही या दिनदर्शिकेचे आज मान्यवरांच्या हस्ते मोठ्या थाटात प्रकाशन करणयात अाले.
या प्रसंगी उपस्थित मान्यवंरानी दिनदर्शिकेचे तोंड भरून कौतुक केले तसेच साप्ता,अक्षर मशाल चे संपादक भुपेंद्र मराठे यांनी आपल्या मनोगतात सांगितले कि जळगांव जिल्ह्यातील १९५५ पासुन एका महिलेने चालविलेले एकमेव दैनिक म्हणुन दैनिक लोकशाही ची वाटचाल सुरू असुन हे एकमेव दैनिक असे आहे जे मागील ६६ वर्षापासुन निर्भिड पणे सुरू आहे. त्यानंतर जिल्ह्यात अनेक दैनिके व साप्ताहीक सुरू झालीत व ते काळाचा ओघात बंद ही झालीत पंरतु दैनिक लोकशाहीची जेवढी स्तुती करावी तेवढी कमी आहे हे दैनिक असेच अविरत निर्भिड पणे सुरू राहावे याच या प्रसंगी शुभेच्छा तर सावित्री फायरचे मालक चंद्रकांत शिरोळे यांनी दैनिक लोकशाही च्या दिनदर्शिकेचे कौतुक करत म्हटले कि या दिनदर्शिकेत कुढे ही तडजोड न करता उत्तम प्रकारचा कागद वापरण्यात आला. असुन खरोखरच हि दिनदर्शिका प्रत्येकाला हवी हवीशी वाटणारआहे. आकर्षक रंगसंगती व ठळक सणवार या दिनदर्शिकेत दरशवण्यात आले असुन जाहीरात दारांना ही यात योग्य ते स्थान देण्यात आल्याचे त्यांनी नमुद केले. तर सुयोग गॅस एजंन्सी चे मालक अजित नांदेडकर यांनी दैनिक लोकशाही चे नेहमीच सत्यता मांडण्याची प्रथा कायम ठेवली असुन पुढे ही हेच लक्ष आपले राहो म्हणुन शुभेच्छा दिल्या तर पारोळा नगर पालिकेचे आरोग्य सभापती दिपक अनुष्ठान यांनी आपल्या मनोगतात सांगितले कि आजच्या या फास्ट जगता दैनिक लोकशाही ने जगाच्या बरोबरी चालणे सुरू केले असुन त्यांचे ही सुपर फास्ट वेब पोर्टल सुरू असुन कोणती ही बातमी ते त्वरीत प्रकाशित करून स्पर्धेत टिकुन आहेत तसेच त्यांचे स्वताचे लोक लाईव चॅनल देखिल जळगाव जिल्ह्यात प्रसिध्द असुन आगमी काळात त्यांचे हे चॅनल संपुर्ण महाराष्ट्र भर सुरू व्हावे अश्या या प्रसंगी शुभेच्छा या प्रसंगी पारोळा येथिल प्रसिध्द असे अमृत गृपचे मालक केशव क्षत्रिय,ओमसांई किराणाचे मालक खेमचंद हिंदुजा,B,G,गारमेन्टस् चे मालक विक्रम लालवाणी,सिंधी समाजाचे वरिष्ठ सुरेश हिंदुजा, कृषि उत्पन्न बाजार समितीचे संचालक प्रकाश वाणी ,राजकुमार नागदेव,तसेच इतर मान्यवर उपस्थित होते सर्व प्रथम आलेल्या सर्व मान्यवरांचे प्रथेप्रमाणे पुष्पगुच्छ देऊन दैनिक लोकशाहीचे तालुका प्रतिनिधी अशोककुमार लालवाणी यांनी स्वागत केले,तर कार्यकर्माच्या शेवटी सर्व मान्यवरांचे उपस्थिती बद्दल विक्रम लालवाणी यांनी आभार मानले.