पारोळा येथे भाजपाच्या वतीने चक्काजाम आंदोलन

0

मंत्राचा पोरगाच मंत्री झाला पाहिजे या सरकार चे धोरण –अतुल मोरे

पारोळा प्रतिनिधी : भारतीय जनता पार्टी,पारोळा तालुका व शहराच्या वतीने दिनांक दि.२६ जुन २०२१ वार.शनिवार रोजी सकाळी ठीक ९:३० वाजता, कजगांव चौफुल्ली,पारोळा या ठिकाणी पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत चक्का जाम आंदोलन करण्यात आले.

यावेळी “”ओबीसी के सन्मान में भाजपा मैदान मे” च्या घोषणा देण्यात आल्या. ओबीसी आरक्षण परत मिळावे यासाठी चक्काजाम आंदोलन करण्यात आले. आंदोलन स्थळी भाजपा पारोळा तालुका अध्यक्ष ॲड.अतुल मोरे यांनी कशा प्रकारे हेतुपुरस्कर राज्यसरकारने ढिलाई दाखवली की जा मुळे आज स्थानिक स्वराज्य संस्थानच्या निवडणुकीत म्हणजे जिल्हापरिषद,पंचायत समिती,ग्रामपंचायतीत ओबीसी उमेदवार आरक्षणाच्या बळावर निवडणूक लढू शकणार नाही,व आपली सेवा जनतेला देऊ शकणार नाही,,या राज्य सरकारच धोरण आहे की राजाचा पोरगाच राजा झाला पाहिजे.

मंत्र्यांचा पोरगाच मंत्री झाला पाहिजे,,तळागाळातला कार्यकर्ता कधी पुढे येऊच नाही,,कारण या नाकर्तेपणामुळे सर्व पक्षांच्या सर्व ओबीसी मागासवर्गीय सर्व सामान्य कार्यकर्त्याला डावळण्याच काम या तीन तिघाडा काम बिघाडा सरकारने केलं आहे,,कारण सर्वोच्य न्यायल्याचया सूचनेच पालन यांनी केलं असत आणि वेळेवर मागासर्वगिय आयोग स्थापन केला असता व ५०%च्या वर जात असलेल्या आरक्षणावर फेर विचार केला असता तर!आज सरसगट ओबीसी वर्गावर अन्याय झाला नसता,,कारण निवडणुकीतील ओबीसींना २७% आरक्षण हे राज्य विधिमंडळाने दिलेल वैधानिक आरक्षण होत त्यामुळे त्याचा तपशील व पाठपुरावा करण्याची सर्वोत्तपरी जबाबदारी राज्य सरकारची होती,जी यांनी केली नाही आणि अखेर राज्यसरकारच्या नाकर्तेपणामुळे समस्त ओबीसी वर्ग आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीला मुकणार आहे.

आंदोलनाच्या यशस्वीतेसाठी भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष ॲड.अतुल मोरे , जिल्हा सचिव रवींद्र भोमा पाटील ,कोषाध्यक्ष गोपाल शेठ दाणेज ,शहराध्यक्ष  मुकुंदा चौधरी धिरज महाजन  ,सरचिटणीस सचिन गुजराथी ,व्यापार उद्योग आघाडी अध्यक्ष  केशव क्षत्रिय ,विनोद हिंदुजा ,सरचिटणीस समाधान पाटील ,सरचिटणीस गणेश पाटील, नरेंद्र  राजपूत ,नरेंद साळी ,विजय जगताप ,समीर वैद्य ,जे के पाटील ,प्रविण बडगुजर ,संकेत दाणेज ,गोपाल महाजन, अमोल पाटील ,भिकन पाटील ,पांडुरंग शिंपी ,सुरेश गढरी ,समाधान धनगर ,रवींद्र वाघ ,सोपान पाटील ,भुषण पाटील ,लक्ष्मीकांत भावसार, भगवान ठाकरे ,देविदास अहिरे, महेंद्र पाटील, साहेबराव पाटील ,धनंजय पाटील ,स्वप्निल पाटील ,गोटू वाणी ,गणेश क्षत्रीय ,कैलास पाटील आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.