पारोळा – पारोळा येथे आज दि,२३ सोमवार रोजी सकाळी न पा चौकात राज्य सरकारचा निषेध करीत भारतीय जनता पार्टी च्या वतिने विज बिलांची होळी करण्यात आली. पारोळा तालुका भाजपा उपाध्यक्ष विश्वास पाटील यांनी उपस्थित नागरिकांना संबोधित करित सांगितले कि नाकर्त्या राज्य सरकार ने जनतेचा विस्वास घात केला आहे. आगोदर लाकडाॅऊन काळातील विज बिल माफ करण्याचे आश्वासन देत नंतर मात्र आपला शब्द फिरवित कोणतेही विज बिल माफ होणार नाही असे म्हणुन जनतेचा विश्वासघात केला म्हणुन पारोळा तालुका भाजपाच्यावतीने आज विज बिलांची होळी करून राज्य सरकारचा निषेध व्यक्त करित आहोत . या वेळी धिरज महाजन यांनी आपले विचार व्यक्त करित सांगितले कि साधरण मार्च महिण्या पासुन राज्यात लाॅकडाऊन होते ते हळु हळु आगस्ट महिन्या पासुन उघडण्याची प्रक्रिया सुरू आहे,परंतु मार्च ते जुलै महिन्या पर्यंत साधरण पाच महिने सर्वच व्यवहार ठप्प होते कोणतेच उत्पनाचे क्षेत्र नव्हते म्हणुन भाजपा च्या वतीने या पाच महिण्याच्या कालावदी चे लाईट बिल माफ करावे म्हणुन राज्य भर आंदोलने करित आहोत या राज्य सरकारने राज्यातील जनते चा विस्वास घात केला असुन अनेक गरीब शेतकर्यांना व नागरिकांना कोणती रिडींग न घेता अव्वा च्या सव्वा लाईट बिले दिली आहेत म्हणुन आज आम्ही राज्य सरकार चा निषेध व्यक्त करून या लाईट बिलांची होळी करित आहोत. , यावेळी पारोळा भाजपा च्या वतीने राज्य सरकार विरोधी घोषणा देऊन आपला निषेध व्यक्त केला या वेळी भाजपा पारोळा तालुका भाजपा उपाध्यक्ष विस्वास पाटील, सचिन गुजराथी,पारोळा तालुका व्यापारी आघाडी अध्यक्ष केशव क्षत्रिय,रंविद्र पाटील धिरज महाजन,नरेंद्र राजपुत,विनोद हिंदुजा,अनिल टोळकर,गोपाल दाणेज,सुनिल भालेराव, समिर वैद्य,संकेत दाणेज, शाम पाटील,गणेश क्षत्रिय,भिकन पाटील,नरेंद्र साळी,कैलास चौधरी,गोटु वाणी, यांच्या सह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.


