Saturday, October 1, 2022

पारोळा येथे भक्तांची मांदियाळी, भाविकांमध्ये आनंदाचे वातावरण

- Advertisement -

पारोळा, लोकशाही न्यूज नेटवर्क 

- Advertisement -

राज्यतील मंदिरांची दारे आज अनेक महिन्यानंतर उघडली.  मंदिरे उघडताच मंदिरामध्ये भक्तांची मांदियाळी पहायला मिळाली.  शहरातील प्रमुख बालाजी मंदिर, भवानी गडावरील  झपाट भवानी मंदि, तसेच मोठे राम मंदिर येथे आज सकाळी भक्तांची गर्दी पहायला मिळाली.

- Advertisement -

- Advertisement -

आजपासून शारदीय नवरात्रोत्सव म्हणजेच पारोळा येथील यात्रोत्सवला सुरूवात  झाल्याने मागील ३५० वर्षाची परंपरा असलेल्या शहरातील तसेच खान्देशातील सर्वात मोठा यात्रोउत्सव म्हणुन पारोळा येथील यात्रोत्सवाकडे पाहिले जाते. म्हणुन आज सकाळी जेव्हा बालाजी मंदिर उघडले गेले तेव्हा  मंदिर परिसरात आनंदाचे, उत्साहाचे वातावरण जाणवत होते.

सकाळी भवानी गडावर ही भक्तांची रिघ लागली होती. मंदिर उघडल्याने अनेक लहान मोठे व्यवसायिक ज्यांची उपजिविका या मंदिर परिसरात आहे. त्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता. शहरातील दोन्ही प्रमुख मंदिरे बालाजी मंदिर व झपाट भवानी मंदिरावर विविध रंगाची विद्युत रोषणाई करून मंदिराची सजावट करण्यात आली असल्याने सांयकाळी ह्या मंदिराचे दृष्य पाहण्यासारखे आहे.

ही मंदिरे  नवनविन विद्युत रोषणाईने सजविल्याने मंदिर व मंदिर परिसर या रोषणाईत न्हाऊन निघाले आहेत. विद्युत रोषणाईचे बालाजी मंदिरावरिल काम येथिल प्रसिध्द डेकोरेटर निलेश वामन कुंभार यांनी आपल्या कार्य कौशल्याने केले आहे. तसेच सांयकाळी भक्तांची या मंदिरावर गर्दी पाहायला मिळत आहे. दोन्ही मंदिराच्या प्रवेश द्वारावरच सोशल डिस्टन्ट ठेवा, माॅस्क शिवाय मंदिरात प्रवेश करूनये असे फलक लावण्यात आले असुन प्रवेश द्वारावर स्वंयसेवकांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रत्येकाने आपआपली काळजी घेणे आवश्यक आहे. अशा सुचना वेळोवेळी दिल्या जात आहेत.तसेच मंदिर प्रशासनाच्या वतीने आवाहन  करण्यात येत आहे की मंदिर दररोज उघडे राहाणार असल्याने भाविकांनी गर्दी करू नये.

- Advertisement -
spot_imgspot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

हे वाचायलाच हवे

संबंधित बातम्या